वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:04 IST2021-05-21T04:04:32+5:302021-05-21T04:04:32+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक मंगळवारी सायंकाळी राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या ...

Online meeting of the State Executive of the Newspaper Vendors Association | वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक

वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक मंगळवारी सायंकाळी राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

संघटनेच्यावतीने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन बैठकीस सुरुवात झाली. त्यानंतर राज्यातील कोरोनाबाधित व कोरोनाने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांची माहिती घेण्यात आली. आपापल्या जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणींविषयी व कोरोनामुळे काही नुकसान झाले आहे, त्याची माहिती घेतली पाहिजे, असे मत सरचिटणीस बालाजी पवार यांनी व्यक्त केले.

कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी सर्व व्यवस्थापन किंवा शासनावर अवलंबून न राहता आपण काहीतरी केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. सुनील पाटणकर यांनी अध्यक्षीय समारोप केला तर सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांनी संघटनात्मक कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले. सरचिटणीस बालाजी पवार यांनी आभार मानले. उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, संघटन सचिव रवींद्र कुलकर्णी, शिवाजी खेडकर, कोकण विभाग निमंत्रक प्रभारी दत्ता घाडगे, कार्यकारिणी सदस्य राजू टिकार, मनीष राजनकर, जगदीश उमरदंड, भारत माळवे, दत्ता ठाकरे यांनी आपापल्या जिल्ह्यातील माहिती सादर केली. तसेच बैठकीत कोषाध्यक्ष गोरख भिलारे, मनीष वासनिक, सुर्यकांत टेंबे, महेश कुलथे, रवींद्र कांबळे, किशोर सोनवणे, आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Online meeting of the State Executive of the Newspaper Vendors Association