भगवान मुनीसुव्रतनाथांचा ऑनलाइन अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:05 IST2021-03-18T04:05:46+5:302021-03-18T04:05:46+5:30
महोत्सवाचा झूम ॲप, फेसबुक व जीनवानी चॅनलच्या माध्यमातून हजारो भाविकांनी घरी बसून लाभ घेतला. मुनिसुव्रतनाथ भगवंताचा जल, आम्ररस, मोसंबी, ...

भगवान मुनीसुव्रतनाथांचा ऑनलाइन अभिषेक
महोत्सवाचा झूम ॲप, फेसबुक व जीनवानी चॅनलच्या माध्यमातून हजारो भाविकांनी घरी बसून लाभ घेतला. मुनिसुव्रतनाथ भगवंताचा जल, आम्ररस, मोसंबी, नारळ रसांनी पंचामृत अभिषेक करण्यात आला. इंद्र, इंद्राणी बनण्याचे सौभाग्य अशोक सुमन जैन यांना मिळाला. शांतिमंत्राचा मान प्रदीप पहाडे हैदराबाद यांना मिळाला. दुग्धाभिषेकचा मान मनोज चौधरी हैदराबाद यांना मिळाला.
महोत्सवाचे ऑनलाइन सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे तर प्रास्ताविक विलास पहाडे यांनी केले.
अंतरमना आचार्य प्रसन्न सागर महाराजांनी अभिषेक व शांतिमंत्राचे ऑनलाइन उद्बोधन पटना, बिहार येथून केले. महोत्सवासाठी अध्यक्ष महावीर बडजाते, महामंत्री विलास पहाडे, कोषाध्यक्ष विजय पापडीवाल, विश्वस्त प्रमोद कासलीवाल, जयकुमार बाकलीवाल, रायचंद बोस, मनोज काला, प्रकाश कासलीवाल, कैलास पाटणी, संजय गंगवाल, किशोर भाकरे, राजेंद्र काला, सुमित गंगवाल, स्वदेश पांडे, अभिजित काला, संजय पापडीवाल यांनी परिश्रम घेतले.