कांद्याचा टेम्पो उलटला

By Admin | Updated: May 31, 2016 00:29 IST2016-05-31T00:26:08+5:302016-05-31T00:29:08+5:30

तामलवाडी : कांद्याची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला़ हा अपघात तुळजापूर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील

The onion turned the tempo upside down | कांद्याचा टेम्पो उलटला

कांद्याचा टेम्पो उलटला

तामलवाडी : कांद्याची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला़ हा अपघात तुळजापूर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सुरतगाव शिवारात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडला़ दरम्यान, अपघातानंतर टेम्पोतील कांदा परिसरात पडल्याने संबंधिताचे मोठे नुकसान झाले़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील टेम्पो (क्र. एम.एच.०४ सीपी ६६१) हा कांदा घेवून तुळजापूर मार्गे सोलापूरकडे जात होता़ हा टेम्पो सोमवारी पहाटेच्या सुमारास सुरतगाव शिवारात आला असता टेम्पो फुटल्याने चालकाचा ताबा सुटून टेम्पो पलटी झाला़ या अपघातात चालक सहदेव टोणे (वय -३५, रा. बीड) हा गंभीर जखमी झाला. जखमीला पोलिसांनी व नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल केले़
दरम्यान, रस्त्यावर पलटी झालेल्या टेम्पोला एका खासगी बसने धडक दिल्याचे वृत्त आहे़ यामुळे कांद्याचे पोते फुटून कांदा भर रस्त्यावर पडला होता. या अपघाताची नोंद सोमवारी तामलवाडी पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. (वार्ताहर)

Web Title: The onion turned the tempo upside down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.