कोवळ्या सोयाबीनच्या पिकावर पाने कुरतडणाऱ्या अळीचे आक्रमण...
By Admin | Updated: August 4, 2014 00:50 IST2014-08-04T00:33:41+5:302014-08-04T00:50:00+5:30
उमरगा : पावसाने ओढ दिल्यान तूर, उडीद, व मुग ही कोवळी पिके सुकू लागली आहेत.

कोवळ्या सोयाबीनच्या पिकावर पाने कुरतडणाऱ्या अळीचे आक्रमण...
उमरगा : पावसाने ओढ दिल्यान तूर, उडीद, व मुग ही कोवळी पिके सुकू लागली आहेत. तर दुसरीकडे कोवळ्या सोयाबीनच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या व कुरतडणाऱ्या अळीने आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तालुक्यात खरीपाचे एकूण ७२ हजार दोनशे सरासरी क्षेत्र आहे. प्रामुख्याने उडीद, तूर, मुग, सोयाबीन या खरीप पिकांची पेरणी करण्यात येते. यावर्षी तब्बल महिनाभराने उशिरा झालेल्या पावसामुळे पेरण्यांना विलंब झाला आहे. उशिरा झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेऱ्याला सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. उडीदाच्या एकूण १३ हजार ६२३ हेक्टर क्षेत्रापैकी ८ हजार ९६५ हेक्टर क्षेत्रात पेरण्या करण्यात आल्या आहेत. मुगाच्या एकूण चार हजार ५८० हेक्टर क्षेत्रापैकी १ हजार ६६० हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. यावर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीस जास्तीचे प्राधान्य दिले. सोयाबीन पिकासाठी ६ हजार ९१७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. प्रत्यक्ष २२ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. टक्केवारीचा विचार केला असता हा आकडा ३१९.२० वर पोहोंचला आहे. अनेक भागात सोयाबीनचे पीक बऱ्यापैैकी आले आहे. परंतु, एकीडे पावसाने ओड दिली आहे. तर दुसरीकडे कोवळी पिके पाने कुरतडणाऱ्या अळ्या फस्त करू आल्या आहेत. अशा प्रकारे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळे आभाळाकडे लागले आहेत.
वि द्रा व्य ख ता ची फ वा र णी क रा
पावसाने ओढ दिल्यामुळे शिवारातील वाढीस लागलेली कोवळी पिके अपुऱ्या ओलीमुळे सुकण्याच्या मार्गावर आहेत. पिके तग धरुन राहण्यासाठी आंतर मशागत करणे, पीक तण विरहीत करण्यात यावे, पावसाचा ताण सहन करण्यासाठी १३:०:४५ या विद्राव्या खताची फवारणी १० ग्रॅम याप्रमाणे १० लिटर पाण्यातून फवारणी करण्यात यावी. अळीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के लिंबोळी अर्क, ड्रायसोफीन २० मिली १० लिटर पाण्यातून किंवा प्रोपॅनोकॉन ४० ईसी सायपरमेथ्रीन ४ इसी प्रोपेवस सुपर किंवा पॉनिट्रीन सी (१४) २० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हणमंत गोरे, मंडळ कृषी अधिकारी मुरली जाधव यांनी केले आहे.