वैजापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:40+5:302021-06-09T04:06:40+5:30
वैजापूर कांदा मार्केटमध्ये तीन दिवस मोकळा तर तीन दिवस गोणीतील कांदा खरेदी करण्यात येतो. मंगळवारी मोकळा कांदा खरेदी करण्यात ...

वैजापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली
वैजापूर कांदा मार्केटमध्ये तीन दिवस मोकळा तर तीन दिवस गोणीतील कांदा खरेदी करण्यात येतो. मंगळवारी मोकळा कांदा खरेदी करण्यात आला. ४११ वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता. या कांद्याला किमान ५०० व कमाल १७८० तर सरासरी १३०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. यावर्षी जून महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे; मात्र कांदा बाजारभाव बेभरवशाचा असून भाव घसरण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात कांद्याला ५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. वैजापूर कांदा मार्केटवर नगर, नाशिक जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी येतो. या भागातील कांदा रुचकर असल्याने बाहेर राज्यातील व्यापाऱ्यांकडून कांद्याला मागणी आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढायला सुरुवात केली आहे.
कोट
यापूर्वी कांद्याला कमी भाव मिळत होता. मात्र जून महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यामुळे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या मिळणाऱ्या भावावर शेतकरी समाधानी आहेत.
-पंजाबराव थोरात, सहायक सचिव, बाजार समिती
कोट
यावर्षी उन्हाळ कांद्याचे बियाणे मिळण्यास शेतकऱ्यांना खूप अडचणी आल्या. महाग बियाणे विकत घ्यावे लागले. त्यातच कांदा बियाणे कंपन्यांनी बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. कांद्याला चार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना कोरोना काळात दिलासा मिळेल.
किशोर लोहकणे, कांदा उत्पादक शेतकरी, नगिना पिंपळगाव
कोट
कांदा भाव वाढल्याच्या विनाकारण चर्चा होतात. माध्यमे ओरड करतात. यामुळे सरकार कांदा भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करते आणि शेतकऱ्यांना भाववाढीचा फायदा होण्याच्या आत कांद्याचे दर कोसळतात. कांद्याला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना फायदा होईल.
प्रदीप गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी, चांडगाव
फोटो सह
080621\20210608_184328.jpg
कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केट