दुचाकी अपघातात एक जागीच ठार
By Admin | Updated: September 10, 2015 00:30 IST2015-09-10T00:27:15+5:302015-09-10T00:30:33+5:30
वाशी : कुत्रे आडवे आल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या गार्डस्टोनवर जावून आदळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला.

दुचाकी अपघातात एक जागीच ठार
वाशी : कुत्रे आडवे आल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या गार्डस्टोनवर जावून आदळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील वाशी तालुक्यातील प्रताप पेट्रोलपंपाजवळ बुधवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली. अपघातातातील मयत व जखमी दोघेही औरंगाबाद येथील रहिवाशी आहेत.
पोलीसांनी सांगितले की, सुनील पंढरीनाथ कांबळे (वय ३५, रा. मिसारवाडी, ता.जि. औरंगाबाद) व रामेश्वर सखाराम तुपे (रा. नरेगाव एमआयडीसी, चिकलठाणा, औरंगाबाद) हे बुधवारी मजुरी काम करण्यासाठी औरंगाबादहून दुचाकी क्रमांक (एमएच.२०/ डीएच. १५८६) वरून उस्मानाबादकडे जात होते. तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील प्रताप पेट्रोलपंपासमोर त्यांच्या दुचाकीसमोर कुत्रे आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या गार्डस्टोनवर जाऊन आदळली. यामध्ये सुनील कांंबळे हे जागीच ठार झाले तर रामेश्वर तुपे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातस्थळी सपोनि भिमसिंंग चौहान व पोउपनि शेख हे सहकाऱ्यासह दाखल झाले होते.