शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

रस्ता एक अन् बाता अनेक ! एका रस्त्याचे सहा वर्षांत चार वेळा भूमिपूजन, आता तरी सुरु व्हावे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 3:28 PM

Eknath Shinde's Aurangabad Visit: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आता तरी काम चालू होईल का? नाही तर पुन्हा पाचव्यांदा भूमिपूजन करावे लागेल.

औरंगाबाद : मागील सहा वर्षांत बाळकृष्णनगर-विजयनगरातील शिवनेरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे चार वेळा भूमिपूजन झाले(Bhumipujan of a road four times in six years in Aurangabad ) . एका रस्त्याच्या कामासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय व्यासपीठावरून बाता झोडल्या. परंतु रस्त्याचे काम काही सुरू झाले नाही. मंगळवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा बार उडविण्यात आला. यावेळी तरी रस्त्याचे काम होणार की नाही, असा प्रश्न भाजपने केला आहे. तर रस्त्याच्या कामामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत ‘ग्राऊंड लेव्हल’ चे राजकारण पेटले आहे.

१० जानेवारी २०२१ रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रस्त्याच्या कामासाठी भूमिपूजन केले. त्यासाठी शासनाकडून ४९ लाख रुपये विशेष निधी माजी नगरसेविका ज्योती मोरे यांनी मंजूर करून घेतला. मनपाने ४९ लाख रुपयांची निविदांसह वर्कऑर्डर काढून जाधव कंत्राटदाराला कामही दिले. काम वेळेत सुरू केले नाही, म्हणून कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्यात आले. नंतर माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आ. संजय शिरसाट यांच्यामार्फत निधी मिळविला. पुन्हा एकदा जंगी शक्तिप्रदर्शन करीत शिरसाट आणि जंजाळ यांनी वॉर्डात नगरविकास मंत्र्यांना आणून महाविकास आघाडीतील आलबेल कारभाराला डिवचत फक्त सेना नेत्यांचे व्यासपीठ भरविले. मंगळवारच्या कार्यक्रमाला मंत्री संदिपान भुमरे, माजी खा. चंद्रकांत खेैरे, आ. अंबादास दानवे, खा. हेमंत पाटील, नंदकुमार घोडेले, विनोद घोसाळकर, राजू वैद्य आदींची उपस्थिती होती.

आ. शिरसाटांनी लगावला टोलाआ. शिरसाट यांनी भूमिपूजनाची चौथी वेळ असल्याचे सांगून अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंत्री आले; पण काम काही सुरू झाले नसल्याचा टोला लगावला. या पूर्व मतदारसंघाचे आमदार दुसरे आहेत. (भाजपचे नाव न घेता) परंतु येथील जनता आपली आहे, म्हणून निधी आणल्याचे ते म्हणाले.

शिंदे म्हणाले, यावेळी तरी काम सुरू करानगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, आता तरी काम चालू होईल का? नाही तर पुन्हा पाचव्यांदा भूमिपूजन करावे लागेल.

भाजप आमदारांच्या मतदारसंघातआ. सावे यांच्या मतदारसंघातील वॉर्डात रस्त्यासाठी निधी आणून भाजपच्या मुसक्या आवळल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसची मनपा निवडणुकीत गरज राहणार नाही, असा इशाराही देऊन टाकला. तसेच आ. हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोरील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून शिरसाट यांनी त्यांनाही डिवचले.

आ. अतुल सावे यांचे प्रत्युत्तरआ. अतुल सावे म्हणाले, चार वेळा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच भूमिपूजन केले. दिवाकर रावते, खैरे, टोपे यांनी भूमिपूजन केल्याचे सर्वांना माहिती आहे. त्या कामासाठी मनपाने एनओसीदेखील दिली. त्यामुळे मला त्या रस्त्याचे काम करता आले नाही. मनपाने एनओसी दिल्यानंतर दुसरा निधी तेथे वापरता येत नाही. त्यामुळे काम झाले नाही. आता ते व्हावे, ही अपेक्षा आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका