शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

टाळ्या, हास्यकल्लोळात रंगला ‘वन मिनिट गेम शो!’

By admin | Updated: September 21, 2014 00:38 IST

औरंगाबाद : ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने आयोजित ‘वन मिनिट गेम शो’मध्ये सख्यांनी धमाल मस्ती करीत अनेक बक्षिसे जिंकली.

औरंगाबाद : ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने आयोजित ‘वन मिनिट गेम शो’मध्ये सख्यांनी धमाल मस्ती करीत अनेक बक्षिसे जिंकली. यावेळी ‘इश्कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटाच्या तरुण कलाकारांशी संवाद साधण्याची संधीही सखींना मिळाली.आॅक्टोबरमध्ये ‘इश्कवाला लव्ह’ हा मराठी चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या टीमने सखी मंचच्या सदस्यांसोबत दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यावेळी दिग्दर्शिका रेणू देसाईसह अभिनेता आदिनाथ कोठारे, नवोदित अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही, गायिका आनंदी जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी चित्रपटाची माहिती देताना सांगितले की, हा चित्रपट कुटुंबियांसह पाहण्यासारखा आहे. चित्रपटात आदिनाथ कोठारेची भूमिका एका चॉक लेट बॉयप्रमाणे आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सुलग्ना पाणिग्रही चित्रपटसृष्टीत प्रवेश करीत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना छोटे-मोठे किस्सेही सखींसोबत शेअर करण्यात आले. यावेळी गायिका आनंदी जोशी यांनी चित्रपटातील डोहाळे जेवणाच्या वेळी चित्रित केलेले गाणे सादर करून महिलांची दाद मिळविली. याशिवाय इतरही बरीच गाणी चित्रपटात असल्याचे तिने नमूद केले. एक आगळीवेगळी प्रेमकथा असलेला हा चित्रपट असल्याची माहिती टीमने दिली.यावेळी रोहित कपूर यांनी एका मिनिटात संपतील असे अनेक गेम शो घेतले. या स्पर्धांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संगीत खुर्चीसह रुपया व वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्यासारखे अनेक गेम घेण्यात आले. टाळ्या आणि हास्यकल्लोळात स्पर्धा कधी संपल्या याची जाणीवही सखींना झाली नाही. म्युझिकल गेममध्ये तर महिलांना मोठ्या संख्येत सहभाग घेता आला. स्पर्धांची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. तसेच सुरुवातीस छोट्या-छोट्या गोष्टींचे साम्य असलेल्या स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांचा उत्साह पाहून सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांनी स्वत: पुढाकार घेऊन काही स्पर्धा घेतल्या. त्याचबरोबर विजेत्यांना बक्षिसांचेही वितरण केले.यावेळी सखी मंचच्या अध्यक्ष रेखा राठी यांच्यासह मनीषा सोनी, गीता अग्रवाल, गीता सी. अग्रवाल, सरोज बगाडिया, बिना अग्रवाल, अरुणा काबरा, पद्मजा मांजरमकर आदींची उपस्थिती होती.