शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

तलावात दहा लाख मत्स्यबीज

By admin | Updated: July 28, 2014 00:58 IST

भोकरदन : तालुक्यातील पाणीसाठा असलेल्या तलावात सुमारे दहा लाख एवढे मत्स्यबीज टाकण्यासाठी मच्छिमारांनी लगबग सुरू केली आहे़

भोकरदन : तालुक्यातील पाणीसाठा असलेल्या तलावात सुमारे दहा लाख एवढे मत्स्यबीज टाकण्यासाठी मच्छिमारांनी लगबग सुरू केली आहे़तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक पाझर तलावांत काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे येथे मत्स्यबीज सोडण्यात येत आहेत.तालुक्यातील जुई, धामणा , पदमावती, बाणेगाव, चांदई एक्को, रेलगाव येथील मध्यम प्रकल्पासह दगडवाडी, गोकुळ,हासणाबाद, बाभुळगाव, कोदोली, लिंगेवाडी या परिसरातील पाझर तलावात काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याने मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या तलावामध्ये जून महिन्यांत मत्सबीज सोडण्यात येते. मात्र यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाल्यामुळे तलावात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्यापासून मच्छिमारांनी तलावामध्ये बिज सोडण्यास सुरूवात केली आहे.तालुक्यात कटला, राहू, मिरगल, सुपरनखा, मांगूर या जातीच्या माशांना जास्त मागणी असल्याने कलकत्ता येथून या जातीचे बीज डब्याची मागणी करीत असल्याचे मच्छिमार सोसायटीचे हिरासेठ सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी यांनी सांगतिले.ग्रामीण भागातील प्रत्येक मच्छिमार काही बीज खरेदीसाठी कलकत्ता येथे जाऊ शकत नाही. त्यामुळे कलकत्ता येथून भुसावळपर्यंत या मत्स्यबीज आणले जातात. तेथून आम्ही भोकरदन येथे किरकोळ व्यावसाकिांना देतो. यामध्ये प्रत्येक जातीच्या मत्सबिजाचे भाव वेगवेगळे आहेत. एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये १ हजार बीज असतात. ती पिशवी २०० रूपयांना विक्री होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. जुलै महिन्यात तलावात सोडण्यात आलेले हे बीज सहा महिन्यांनंतर ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकते असे हिरा सूर्यवंशी यांनी सांगितले़ मत्स्यबीज वाढीसाठी दमदार पावसाची आवश्यकता असून, जलसाठा वाढणे गरजेचे आहे. (वार्ताहर)शासनाने मार्गदर्शन करावे.... तालुक्यात मत्स्यबीज सोडण्यासाठी अनेक शेतकरी तसेच मासेमार उत्सुक असतात. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाअभावी हा व्यवसाय करता येत नाही. मत्स्य व्यवसाय विभागने विशेष शिबीर अथवा मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांनाही या जोडधंदा ठरु शकतो.मत्स्यबीज सोडले तरी जलसाठ वाढणे अत्यंत गरजेचे आहे. गत काही वर्षांपासून मोठ्या पावसाअभावी मच्छीमारांचे मोठे हाल होत आहे. मासे उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे.