शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

दुसऱ्या डोससाठी एक लाख नागरिक ‘वेटिंग’वर; पुरवठा होत नसल्यामुळे महापालिका हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:09 PM

एकाच लॉटमध्ये पुरवठा होत नसल्यामुळे टोकन देऊनही नागरिकांना लस मिळत नसल्याची परिस्थिती

ठळक मुद्देसात हजार व्हायल्स गुरुवारी आल्या होत्याशुक्रवारसाठी लसीकरणाचे नियोजन नाही.

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोससाठी शहरातील सुमारे एक लाख नागरिक गुरुवारपर्यंत वेटिंगवर होते. १५ हजार लसींचा पुरवठा झाला तरच शुक्रवारपर्यंत नोंदणी झालेल्या नागरिकांना पुढील दोन दिवसांत दुसरा डोस देणे शक्य होणार आहे. लसींचा पुरवठा मागणीच्या तुलनेत व्हावा यासाठी शासनाला पत्र लिहून पालिका प्रशासन हतबल झाले आहे.

गुरुवारी लसींच्या सात हजार व्हायल्स चार तासांत संपल्या. एका व्हायल्समध्ये सुमारे ९ ते १० नागरिकांना डोस देता येतो. त्यामुळे वेटिंगवर असलेल्या एक लाख नागरिकांना दहा हजार व्हायल्स लागतील. परंतु एकाच लॉटमध्ये पुरवठा होत नसल्यामुळे टोकन देऊनही नागरिकांना लस मिळत नसल्याची परिस्थिती गुरुवारी अनेक केंद्रावर दिसून आली. पाच केंद्रांवर नोंदणी करणाऱ्या नागरिकांना पहिला, तर ३४ केंद्रांवर लसीचा दुसरा डोस देण्याची व्यवस्था पालिकेने शहरात केली होती. नोंदणी पहिल्या डोससाठी होती. एका सेंटरवर १५० लसींचा पुरवठा दुसऱ्या डोससाठी करण्यात आला होता. आता वेटिंग लिस्ट एक लाख झाली आहे. ८० हजार नागरिक बुधवारपर्यंत होते. गुरुवारी तो आकडा एक लाखांपर्यंत गेला. कोविशिल्ड लसींची मागणी शासनाकडे केली आहे. असे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

कोविशिल्डचा तुटवडा : आज लसीकरण नाहीसात हजार व्हायल्स गुरुवारी आल्या होत्या. शुक्रवारसाठी लसीकरणाचे नियोजन नाही. पहिल्या डोससाठी नोंदणी केली होती. दुसरा डोस ऑफलाइनच होता. ८४ दिवसांनंतर डोस द्यावा लागेल, अशा नागरिकांची संख्या एक लाखांपर्यंत झाली आहे. कोव्हॅक्सिनचे ३५०० डोस आहेत. तुटवडा मात्र कोविशिल्डचा आहे. साठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लस पुरवठा न झाल्याने शुक्रवारी लसीकरण बंद राहणार आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

अवघ्या चार तासात संपली लसमहापालिकेला सात हजार लसी मिळताच आज गुरुवारी ३९ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. दुसरा डोस घेण्यासाठी ३४ केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. अवघ्या चार तासात लसींचा साठा संपला. कोव्हॅक्सिनची लस उपलब्ध असून, तीन केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनी कूपन घेण्यासाठी केंद्रावर गर्दी केली. प्रत्येक केंद्रावर दीडशे लसींचा पुरवठा करण्यात आला होता. दिवसभरात सुमारे सहा हजार आठशे लस संपल्यामुळे उद्या शुक्रवारी शिल्लक लसीसाठी एखादे केंद्र सुरू राहील, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

तीन केंद्रावर मिळेल कोव्हॅक्सिन लसमहापालिकेकडे कोव्हॅक्सिन लसीचे एक हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे उद्या शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत क्रांती चौक, राजनगर आरोग्य केंद्र आणि सिडको एन-४ मधील एमआयटी हॉस्पिटल या तीन केंद्रांवर पहिला व दुसरा डोस मिळणार आहे. त्याकरिता ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. प्रत्येक सेंटरवर दोनशे लसींचा पुरवठा केला जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद