अपघातात एक ठार,चौघे गंभीर
By Admin | Updated: January 11, 2015 00:55 IST2015-01-11T00:54:34+5:302015-01-11T00:55:28+5:30
नळदुर्ग : भरधाव वेगातील ट्रकने टमटमसह ट्रकला समोरून जोराची धडक दिल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला़ तर इतर चौघे गंभीर जखमी झाले़

अपघातात एक ठार,चौघे गंभीर
नळदुर्ग : भरधाव वेगातील ट्रकने टमटमसह ट्रकला समोरून जोराची धडक दिल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला़ तर इतर चौघे गंभीर जखमी झाले़ हा अपघात शनिवारी सकाळी पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग नजीकच्या बालाघाट महाविद्यालयासमोर घडला़ पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे़
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, इटकळ येथून टमटम (क्ऱएम़एच़२३- एक्स १४२८) शनिवारी सकाळी प्रवाशी घेवून नळदुर्गकडे येत होता़ सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील नळदुर्गनजीकच्या बालाघाट महाविद्यालयानजीक तो टमटम प्रवाशी उतरविण्यासाठी थांबला होता़ त्यावेळी हैद्राबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्ऱएम़एच़४६- एस़२९०८) ने टमटमला समोरून जोराची धडक दिली़ टमटमला धडक देवून पुढे गेलेल्या ट्रकने सोलापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या (क्रक़े़ए़५६- ७३३) ला पाठीमागून जोराची धडक दिली़ या विचित्र अपघातात टमटममधील बाबूराव मारूती जाधव (वय-६०), नागनाथ कदम (दोघे रा़ शिरगापूर), भोजू गोपा चव्हाण, संगिता भोजू चव्हाण (दोघे रा़ धनगरवाडी) व महंमदअली इस्माईल सैला (रा़नळदुर्ग) हे गंभीर जखमी झाले़ जखमींना उपचारासाठी रूग्णालयाकडे नेण्यात येत असताना बाबूराव मारूती जाधव यांचा मृत्यू झाला़ जखमींवर नळदुर्ग येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरकडे पाठविण्यात आले आहे़ घटनेची माहिती मिळताच महामार्गचे सपोउपनि मोरे, नळदुर्ग ठाण्याचे हेकॉ शिंदे, तांबोळी, कृष्णा राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना मदत केली़ तसेच वाहतूक सुरळीत करण्याकामी प्रयत्न केले़ दोन्ही वाहनांना धडक देणाऱ्या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सदरील घटनेचा अधिक तपास सपोनि एम़वाय़डांगे हे करीत आहेत़ (वार्ताहर)