कार अपघातात एक ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 01:09 IST2016-06-21T01:01:51+5:302016-06-21T01:09:36+5:30

वैजापूर-शिऊर : शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम आटोपून मुंबईहून परतणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भरधाव कार शिऊरजवळ पुलाच्या कठड्यावर आदळली

One killed, four injured in car accident | कार अपघातात एक ठार, चार जखमी

कार अपघातात एक ठार, चार जखमी


वैजापूर-शिऊर : शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम आटोपून मुंबईहून परतणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भरधाव कार शिऊरजवळ पुलाच्या कठड्यावर आदळली. या अपघातात शिवसेनेचे बुलढाण्याचे उपजिल्हाप्रमुख जागीच ठार झाले आणि अन्य चार कार्यकर्ते गंभीर जखमी झाले.
वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला रस्त्यावरील सावखेड फाट्याजवळ सोमवारी (दि.२०) सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
शिवसेना पक्ष स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत वर्धापन दिन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी बुलढाणा येथून शिवसैनिक व पदाधिकारी गेले होते. मेळावा आटोपल्यावर पदाधिकारी परतीच्या मार्गाला लागले. नाशिक शहरातील उड्डाणपुलावरून गोवा महामार्गाने चांदवड, मनमाड, नांदगाव पार केल्यानंतर शिऊर बंगला रस्त्यावरील सावखेडा फाटा येथे त्यांच्या तवेरा (एमएच २८ व्ही ४४५३) गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला जाऊन आदळली व पलटी झाली. यामध्ये बुलढाण्याचे उपजिल्हाप्रमुख शांताराम सीताराम जगताप हे जागीच ठार झाले, तर चालक रमेश सिंजोळे (२८), बुलढाणा तालुकाप्रमुख अर्जुन धानंडगे (४०), बुलढाणा येथील वार्ताहर राजेश देशमाने (४१), युवासेना शहर प्रमुख भीमसिंग राजपूत (३८) हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे वैजापूर तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, माजी उपसभापती भागीनाथ मगर, माजी सरपंच बबन जाधव, नंदू जाधव, भरत साळुंके, बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर जाधव, साईनाथ जाधव आदींनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृताची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, शिऊर पोलिसांत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: One killed, four injured in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.