बॅटने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 31, 2015 13:46 IST2015-08-31T13:26:58+5:302015-08-31T13:46:42+5:30
जुन्या भांडणाच्या कारणावरुन बॅट डोक्यात मारल्याने एकाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

बॅटने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
सेलू : जुन्या भांडणाच्या कारणावरुन बॅट डोक्यात मारल्याने एकाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सेलू शहरातील बाबासाहेब मंदिर रोड परिसरात राहणारा शेख नजीर शेख कालेखाँ व आरोपी सचिन धोंडिराम पानझडे यांच्यात काही महिन्यांपूर्वी पाचेगाव येथील यात्रेत मोबाईल सिमकार्डच्या कारणावरुन भांडण झाले होते. याच कारणावरुन २७ ऑगस्ट सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सचिन पानझडे याने शेख नजीर यास घरातून बाहेर बोलावून घेतले.त्यानंतर साथीदारांच्या मदतीने शेख नजीर यास बॅटने मारहाण केली होती. यात शेख नजीर याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याला नांदेड येथे उपचारार्थ दाखल केले होते. शेख नजीर याची प्रकृती चिंताजनक असल्याने नांदेड येथून त्याला औरंगाबाद येथे हलविले जात असताना रविवारी दुपारी वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शेख नजीर याची पत्नी शेख शमिम यांच्या फिर्यादीवरुन सचिन धोंडीराम पानझडे व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस निरीक्षक जे.जे. राठोड हे तपास करीत आहेत. /(प्रतिनिधी)