शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात एक ठार, नऊ जखमी

By admin | Updated: April 14, 2015 00:46 IST

तुळजापूर : रविवारी रात्री तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात एकजण ठार तर नऊजण जखमी झाले. यातील एका अपघाताची तुळजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तुळजापूर : रविवारी रात्री तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात एकजण ठार तर नऊजण जखमी झाले. यातील एका अपघाताची तुळजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील काक्रंबा गावाजवळ जीप पलटी होवून एकजण ठार तर सहाजण जखमी झाले. लातूर तालुक्यातील कदम व जाधव कुटुंब रविवारी रात्री एमएच २४/ व्ही ५७६० या क्रमांकाच्या जीपमधून तुळजापूर येथून देवी दर्शन करून गावाकडे परतत होते. तुळजापूरपासून पाच किमी अंतरावर असलेल्या ज्ञानेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर त्यांची जीप पलटी झाली. यात चालक बिभीषण जगन्नाथराव सुरवसे (वय ३८, रा. पेठ, ता. जि. लातूर) हे जागीच ठार झाले. तर शालुबाई दिगंबर कदम (वय ६५), मुक्ता परमेश्वर कदम (वय ५८, रा. वायलगाव), स्वाती अविनाश जाधव (वय २२), नंदिनी अविनाश जाधव (वय ०२, रा. व्होताला, चिंचोली) हे गंभीर जखमी झाले. तसेच अविनाश जाधव व पायल जाधव हेही किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींवर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, मयत बिभीषण सुरवसे यांचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.दुसरा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास तुळजापूर-सोलापूर मार्गावर घडला. यात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने तिघे गंभीर जखमी झाले़ पोलिसांनी सांगितले की, सिंदफळ येथील मारोती बबन शितोळे (वय-२५), नाना विश्वनाथ पांडागळे (वय-४०) व विठ्ठल गोविंद सरवदे (वय-४५) हे तिघे रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून तुळजापूरकडे निघाले होते़ त्यांची दुचाकी महामार्गावरील एका ढाब्याजवळ आली असता अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली़ अपघातात दुचाकीवरील तिघेही जखमी झाले़ जखमींवर तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते़ प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ (वार्ताहर)