महावितरणचे दीडशे खांब उखडून पडले
By Admin | Updated: June 25, 2014 01:04 IST2014-06-25T00:59:27+5:302014-06-25T01:04:26+5:30
औराद शहाजानी : औरादसह परिसरात ६ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे औराद विद्युत केंद्रातील दीडशे खांब मोडून पडले आहेत़

महावितरणचे दीडशे खांब उखडून पडले
औराद शहाजानी : औरादसह परिसरात ६ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे औराद विद्युत केंद्रातील दीडशे खांब मोडून पडले आहेत़ परिणामी पाच गावातील १०० शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे़
औराद, तगरखेडा, सावरी, शेळगी, माळेगाव, मानेजवळगा आदी गावात ६ जून २०१४ रोजी अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गावाला व शेतीला विद्युत पुरवठा करणारे महाविरणचे विद्युत पोल उन्मळून पडल्याने ५ गावातील १०० शेतकऱ्यांचा विद्युतपुरवठा १० डी़पी़बंद पडल्याने खंडित झाला आहे़ परिणामी या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे़ याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता एस़बी़डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे उन्मळून पडलेल्या एकूण पोलपैकी ३० पोल उभे करण्याचे काम झाले आहे़ उर्वरित कामही सुरू आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचा विद्युतपुरवठा लवकरच सुुरळीत होईल़(वार्ताहर)