शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’; गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी खरी ठरली!

By नंदकिशोर पाटील | Updated: April 24, 2024 11:47 IST

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले अजितदादा ‘टायमिंग’ साधतील का, हा खरा उत्सकतेचा विषय आहे.

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राच्या राजकारणात तसे अनेक ‘दादा’ लोक आहेत. पण सध्या चर्चा आहे एकाच दादांची ते म्हणजे, अजितदादा! राज्य मंत्रिमंडळात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदाचा सांभाळण्याचा एक आगळा विक्रम नावावर असलेले अजित पवार सध्या काकांकडून पळविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले अजितदादा ‘टायमिंग’ साधतील का, हा खरा उत्सकतेचा विषय आहे.

१३ जून २०१३ साली गोपीनाथ मुंडे यांचे एक भाषण औरंगाबाद (तेव्हाचे) शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात झाले होते. व्यासपीठावर विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. विनायकराव मेटे यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. या समारंभात मुंडे यांनी जोरदार भाषण केले. हसून-हसून उपस्थितांची पुरेवाट झाली. विषय पुतण्याचा निघाला. त्यावर मुंडे म्हणाले, ‘हल्ली राज्यातील पुतणे मंडळींना काय झालेय हेच कळेना! जो तो उठतो आणि मला वेगळं व्हायचंय म्हणतो!’ गोपीनाथरावांच्या या वाक्यावर सभागृहात जो हशा आणि टाळ्यांचा कडकडाटा झाला, तो आजही एकनाथ रंगमंदिरात घुमतो आहे. मुंडे पुढे जे बोलले ते खूप म्हत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ‘लिहून घ्या, एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’ गोपीनाथरावांची ही भविष्यवाणी अकरा वर्षांनंतर खरी ठरली! आज मुंडे असते, तर त्यांनी हा किस्सा नक्कीच ऐकवला असता.

असो. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याच्या तालमीत वाढलेल्या, त्यांच्याकडूनच राजकारणातील डावपेच शिकलेल्या अजित पवारांनी आपल्या काकांवर नव्हे तर, राजकीय गुरूंवर असा डाव टाकला की, गुरूंची तालीम आणि तालमीतील बहुसंख्य शिष्यगण पळवले! शिवाय, तालमीला स्वत:चे नावही लावले. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेकांनी बंड केले. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती अजित पवारांच्या बंडखोरीची! का नाही होणार? महाराष्ट्रातील मुंडे, मोहिते, नाईक, निंबाळकर या सारखी मोठी घराणी फुटली तरी, पवार घराण्यात दुभंग निर्माण होईल आणि अजित पवार कुटुंबातून बाहेर पडतील, अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती. पण भाजपच्या चाणक्यांनी डावपेच आखले आणि अजितदादांचे पाऊल उंबऱ्याबाहेर पडले!

पक्ष फोडल्याची बक्षिसी काय?अजित पवार यांना राष्ट्रवादी फोडल्याची बक्षिसी म्हणून उपमुख्यमंत्रिपद आणि आठ मंत्रिपदं मिळाली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात त्यांच्या वाट्याला केवळ पाच जागा आल्या आहेत. त्यातही परभणीची जागा रासपचे महादेव जानकर यांना गेली आहे, तर शिरूरमध्ये शिवसेनेचे आढळराव पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागली. उस्मानाबादमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली. उरल्या फक्त दोन जागा. बारामती आणि रायगड. तिथे अनुक्रमे पत्नी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे हे दोनच उमेदवार खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नऊ आमदार, तरी जागा एकचराष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर मराठवाड्यातील तब्बल नऊ आमदार (विधान परिषदेवरील दोघांसह) अजित पवार यांच्यासोबत गेले. बीडचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले. वास्तविक, मराठवाडा हा शरद पवारांना मानणारा प्रदेश आहे. १९७८ साली पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा माजलगावचे सुंदरराव सोळंके यांना उपमुख्यमंत्रिपद दिले होते. असे असताना या प्रदेशातील बहुसंख्य आमदार अजित पवारांसोबत गेले. मात्र आमदारांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना मराठवाड्यात केवळ उस्मानाबादची जागा मिळाली. तिथेही उमेदवार आयात करावा लागला. वास्तविक, परभणीत त्यांच्याकडे राजेश विटेकर यांच्यासारखा सक्षम उमेदवार होता. मागील निवडणुकीत विटेकर यांनी चांगली लढत दिली होती. परभणीत वंचितचा उमेदवार नसता तर विटेकर विजयी झाले असते. मात्र, बारामतीत धनगर समाजाची मते मिळावीत म्हणून ही जागा आता रासपच्या महादेव जानकरांना देण्यात आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत. बीडचे बजरंग सोनवणे यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवली. बीडमधील अजितदादांच्या तीन आमदारांना भाजपचा प्रचार करावा लागणार आहे.

टॅग्स :baramati-pcबारामतीbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४aurangabad-pcऔरंगाबाद