एकाच दिवशी २१ विकासकामांचा धडाका

By Admin | Updated: September 1, 2014 00:43 IST2014-09-01T00:38:05+5:302014-09-01T00:43:49+5:30

औरंगाबाद : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाच दिवशी २१ विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका पाहावयास मिळाला.

One day, 21 development works | एकाच दिवशी २१ विकासकामांचा धडाका

एकाच दिवशी २१ विकासकामांचा धडाका

औरंगाबाद : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाच दिवशी २१ विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका पाहावयास मिळाला. ही बाब त्या-त्या ठिकाणच्या रहिवाशांना प्रचंड दिलासा देणारी ठरली.
आधीच त्या-त्या भागात एकामागून एक अशी अनेक विकासकामे राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नाने झालेली आहेत. आता पुन्हा त्यात नव्याने भर पडणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड समाधान बघावयास मिळाले. म्हणूनच राजेंद्र दर्डा यांचे जोरदार स्वागत करण्यात नागरिकांनी कमतरता ठेवली नाही. कुठे ढोल- ताशांच्या गजरात तर कुठे फटाक्यांच्या आतषबाजीत, कुठे रांगोळ्या काढून तर कुठे पेढे वाटून त्यांचे स्वागत करण्यात आले.
ज्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले, ती कामे अशी- १) वॉर्ड क्र. ७०, विद्यानगर येथील न्यू विशालनगर येथे नलावडे यांच्या घरापासून काळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे. २) वॉर्ड क्र. ८३, पुंडलिकनगर येथील न्यू हनुमानगर, गल्ली नं. ३ येथील भूषण मेडिकल ते कमल किशन निवासपर्यंत सिमेंट रस्ता करणे. ३) वॉर्ड क्र. ८३, पुंडलिकनगर येथील न्यू हनुमाननगर, गल्ली नं. ३ येथील आर.के. सोनवणे ते अ‍ॅड. जैस्वाल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे. ४) वॉर्ड क्र. ८१, जयभवानीनगर येथील गल्ली नं. १४ मध्ये अश्विनी कुलकर्णी यांच्या घरापासून ते गल्ली नं. १५ पर्यंत ड्रेनेजलाईन टाकणे. ५) वॉर्ड क्र. ८१, जयभवानीनगर गल्ली नं. १२ अंतर्गत उमेश शेजवळ यांच्या घराजवळ सिमेंट रस्ता करणे. ६) वॉर्ड क्र. ८१, जयभवानीनगर येथील विश्रांतीनगर, गल्ली नं. ३ मध्ये ड्रेनेजलाईन टाकणे. ७) गल्ली नं. २ अंतर्गत ड्रेनेजलाईन टाकणे. ८) वॉर्ड क्र. ८१, जयभवानीनगर येथील संदीप शिंदे यांच्या गल्लीत ड्रेनेजलाईन टाकणे. ९) वॉर्ड क्र. ८१, जयभवानीनगर येथील विश्रांतीनगर, गल्ली नं. ३ मध्ये ड्रेनेजलाईन टाकणे. १०) वॉर्ड क्र. ४७, सिडको एन-६ येथील तोडकर यांच्या घरापासून ते महादेव मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता करणे. ११) वॉर्ड क्र. ४६, न्यू अल्तमश कॉलनी येथे सिमेंट रस्ता करणे. १२) वॉर्ड क्र. ४६, अल्तमश कॉलनी येथील गल्ली नं. २, उमर बिन खत्ताब मशीद ते सोहेल पान सेंटरपर्यंत सिमेंट रस्ता करणे. १३) वॉर्ड क्र. ५२. इंदिरानगर येथील गल्ली नं. ११ मध्ये सिमेंट रस्ता करणे. १४) वॉर्ड क्र. ५१, इंदिरानगर उत्तर येथील गल्ली नं. २३ येथील डॉ. पाटील यांच्या घरापासून ते शेख जहूर यांच्या घरापार्यंत सिमेंट रस्ता करणे. १५) वॉर्ड क्र. ४८, चिश्तिया कॉलनी येथील पाच गल्ल्यांसाठी ड्रेनेजलाईन टाकणे. १६) वॉर्ड क्र. ४६, अल्तमश कॉलनीमध्ये परवाना हॉटेलच्या गल्लीत सिमेंट रस्ता करणे. १७) वॉर्ड क्र. ४६, अल्तमश कॉलनी येथील दरबार हॉटेलच्या गल्लीमध्ये सिमेंट रस्ता करणे. १८) वॉर्ड क्र. ४६, अल्तमश कॉलनी येथील रहीमनगरमध्ये अनिल वकील यांच्या गल्लीत सिमेंट रस्ता करणे. १९) वॉर्ड क्र. ४६, अल्तमश कॉलनी येथील रहीमनगर भागात रफिकभाई कुल्फीवाले यांच्या घरापासून ते अनिसभाई यांच्या घरापर्यंत रस्ता करणे. २०) वॉर्ड क्र. ४४, किराडपुरा येथील तय्यब पटेल यांच्या घरामगील नाल्यावर रस्ता व पूल तयार करणे. २१) वॉर्ड क्र. ५३, बारी कॉलनी येथील परमवीर अब्दुल हमीद हॉल ते डॉ. मुश्ताक यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता करणे.
यावेळी दामूअण्णा शिंदे, पंकज फुलपगर, राधाकृष्ण गायकवाड, राजाराम मोरे, रंगनाथ खेडेकर, आतिश पितळे, अशोक डोळस, सुरेश टाक, सुनील त्रिभुवन, विश्वनाथ स्वामी, राजू खरे, रवी तायडे, किसनराव गवळी, सिद्धार्थ वडमारे, देवराव लुटे, शिवा लुटे, एस.बी. चव्हाण, राजू साबळे, पठाण फेरोजखान, मोईन इनामदार, अज्जूभाई, मतीन अहमद, नगरसेवक मुजीबोद्दीन, फेरोजखान, इब्राहीम पटेल, डॉ. जफरखान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: One day, 21 development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.