एक कोटींची पाणीपुरवठा योजना बंद

By Admin | Updated: May 12, 2014 00:04 IST2014-05-11T23:35:18+5:302014-05-12T00:04:51+5:30

हुसेन पठाण , आन्वा भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील गावाला पाणीपुरवठा करणारी एक कोटी रूपयांची योजना धूळ खात पडलेली आहे.

One crore water supply scheme closed | एक कोटींची पाणीपुरवठा योजना बंद

एक कोटींची पाणीपुरवठा योजना बंद

 हुसेन पठाण , आन्वा भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील गावाला पाणीपुरवठा करणारी एक कोटी रूपयांची योजना धूळ खात पडलेली आहे. परिणामी आन्वावासिय तहानलेलेच आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांची दमछाक होत आहे. आन्वा गावाला पाणीपुरवठा व्हावा म्हणून शेलूद धरणातून १ कोटी ६५ लाख रूपये खर्च करून योजना तयार करण्यात आली. २०११ मध्ये बंद पडलेली योजना स्थानिक तरूणांनी पुढाकार घेऊन पुन्हा सुरु केली. ३ ते ४ महिने नियमित पाणीपुरवठा झाला. मात्र त्यासाठीही ग्रामस्थांना घागर मोर्चा तसेच भोकरदन पंचायत समितीसमोर उपोषण करावे लागले. गटविकास अधिकार्‍यांनी पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले. परंतू प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. पंचायत समिती सदस्य नवनाथ दौड यांच्यासह कैलास हजारी, महादु चौधरी, कैलास फाळके, फकीरा पवार, विसपुते, विजय हजारे, डॉ. कृष्णा बनकर, चंपालाल राजपूत, आनंत पोठे, आत्माराम चौधरी यांच्या सहकार्याने पाच दिवसात शेलूद धरणातून गावात पाणी आले. परंतू चार महिन्यानंतर ही योजना बंद पडली. शेलूद धरणामध्ये ७० ते ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. शेलूद धरणातून १ कोटी ६५ लाख रूपये खर्च करून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. परंतु ही योजना बंद पडल्याने ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. ही योजना सुरू करण्याकरिता अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आली परंतू त्याचा काहीही उपयोग नसल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. यामुळे दररोज ग्रामस्थांना विकतच्या पाण्यावरच आपली तहान भागविण्याची वेळ आली आहे. दरम्यान मनसेचे गणेश साबळे, राष्ट्रवादीचे कैलास हजारी, अकबर खान यांनी मुख्य कार्यकारी प्रेरणा देशभ्रतार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सरपंच मंजितराव पांडव म्हणाले की, पाणीपुरवठा योजनेचे फिल्टर नादुरूस्त आहे. त्यामुळे योजना बंद आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन आन्वा गावाला पाणीपुरवठा करणार्‍या शेलूद धरणातील योजना बंद आहे. ती सुरू करण्यासाठी गावातील काही राजकीय पदाधिकार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदन सादर करून योजना सुरू करण्याची मागणी केली.

Web Title: One crore water supply scheme closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.