सोयाबीनचे एक कोटी रुपये अनुदान उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:35 IST2017-11-03T00:35:48+5:302017-11-03T00:35:52+5:30
गतवर्षी सोयाबीन उत्पादक शेतकºयांना शासनाच्या वतीने बाजार समीतीत विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनवर प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. सदर अनुदान येथील बाजार समितीस उपलब्ध झाले असून ५० हजार ५३ शेतकºयांसाठी १ कोटी ७ हजार रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे.

सोयाबीनचे एक कोटी रुपये अनुदान उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : गतवर्षी सोयाबीन उत्पादक शेतकºयांना शासनाच्या वतीने बाजार समीतीत विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनवर प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. सदर अनुदान येथील बाजार समितीस उपलब्ध झाले असून ५० हजार ५३ शेतकºयांसाठी १ कोटी ७ हजार रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे.
गतवर्षी बाजार समितीत आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत २५ क्विंटल किंवा त्यापेक्षा कमी सोयाबीन विक्री करणाºया शेतकºयांना प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. या अनुदास येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी आणणारे २५०५ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकºयांनी ५० हजार ५३ क्विंटल सोयाबीन विक्री केली असून त्यापोटी एक कोटी ७ हजार रुपये अनुदान मंजूर होवून उपलब्ध झाले असल्याची माहिती बाजार समिती सचिव दत्तात्रय वाघ यांनी दिली. लवकरच सदर अनुदान शेतकºयांचा बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.