दीड लाख मेट्रीक टन चाऱ्याची कमतरता !
By Admin | Updated: December 15, 2014 00:42 IST2014-12-15T00:39:48+5:302014-12-15T00:42:23+5:30
उस्मानाबाद : एकोनिसाव्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये लहान-मोठ्या जनावरांची संख्या ७ लाख ३७ हजार ३४७ इतकी आहे.

दीड लाख मेट्रीक टन चाऱ्याची कमतरता !
उस्मानाबाद : एकोनिसाव्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये लहान-मोठ्या जनावरांची संख्या ७ लाख ३७ हजार ३४७ इतकी आहे. या पशुधनासाठी आॅक्टोबर ते जुलै २०१५ या कालावधीत तब्बल ९ लाख ७ हजार ५०० मे. टन इतका चारा आवश्यक आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात ७ लाख ४० हजार मे. टन इतकाच चारा उपलब्ध असून १ लाख ६७ हजार ५०० मे.टन चारा कमी पडत आहे. त्यामुळे हा प्रश्न लक्षात घेवून प्रशासनाला आतापासूनच उपाययोजना कराव्या लागणार, हे निश्चित !
जिल्ह्यामध्ये मोठ्या जनावरांची संख्या ४ लाख १२ हजार १४, लहान जनावरे १ लाख १३ हजार ७९१ तर शेळ्या आणि मेेंढ्यांची संख्या ही २ लाख ११ हजार ५५२ इतकी आहे. टंचाई परिस्थितीमध्ये मोठ्या जनावरला प्रतिदिन ६ किलो तर लहान जनावरला ३ किलो इतका वाळलेला चारा दिला जातो. त्यामुळे या पशुधनास दिवसाकाठी ३ हजार २५ मेट्रीक टन इतका चारा आवश्यक असून महिन्याकाठी लागणाऱ्या चाऱ्याचा आकडा हा ९० हजार ७५० मेट्रीक टन इतका आहे. त्यानुसार आॅक्टोबर २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत ९ लाख ७ हजार ५०० मे. टन इतका चारा लागणार आहे. पत्यक्षात उपलब्ध होणारा चारा ७ लाख ४० हजार मे. टन इतका आहे. त्यामुळे प्रशासनाला कमी पडणाऱ्या १ लाख ६७ हजार ५०० मे. टन चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
असे आहे नियोजन
४कृषी विभागाकडील ७ हजार हेक्टरवरील नियोजनातून ७० हजार मे. टन, पशुसंवर्धन विभागाकडील १ हजार ६०० हेक्टरवरील नियोजनातून १ लाख ६० हजार मे. टन आणि ११ हजार हेक्टवरील उसापासून ८१ हजार ५०० मे. टन चारा उपलब्ध होवू शकतो, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.४
जिल्ह्यात सरासरी ७६७़५ टक्के पाऊस पडणे अपेक्षित आहे़ मात्र, यंदा सरासरीच्या ४४५़८१ मिमी म्हणजे ५८़०९ टक्के पाऊस झाला आहे़ त्यात उस्मानाबाद तालुक्यात ५३़०४ टक्के, तुळजापूर तालुक्यात ६०़७० टक्के, उमरगा तालुक्यात ५५़३७ टक्के, लोहारा तालुक्यात ५५़०१ टक्के, कळंब तालुक्यात ४८़८५ टक्के, भूम तालुक्यात ४८़८१ टक्के, वाशी तालुक्यात ७६़७९ टक्के तर परंडा तालुक्यात ७०़८९ टक्के पाऊस झाला आहे़