गोठ्यातून दीड लाखांच्या बकऱ्या चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:02 IST2021-09-17T04:02:12+5:302021-09-17T04:02:12+5:30

पिशोर : शफेपुर भागात असलेल्या शेतातील गोठ्यातून दीड लाख रुपये किमतीच्या दहा बकऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी ...

One and a half lakh goats were stolen from the barn | गोठ्यातून दीड लाखांच्या बकऱ्या चोरीला

गोठ्यातून दीड लाखांच्या बकऱ्या चोरीला

पिशोर : शफेपुर भागात असलेल्या शेतातील गोठ्यातून दीड लाख रुपये किमतीच्या दहा बकऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शफेपुर भागातील शेतकरी वामन ओपळकर यांचा शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय आहे. दररोजप्रमाणे ओपळकर यांनी जंगलातून चारून आपल्या बकऱ्या रात्री शेतातील गोठ्यात बांधल्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते शेतात गेले नव्हते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बुधवारी रात्री सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या दहा बकऱ्या गोठ्यातून चोरून नेल्या. गुरुवारी सकाळी ते गोठ्याकडे गेले असता त्यांना कुलूप तोडलेले व गोठ्यात बकऱ्या नसल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावर चार चाकी वाहनाच्या चाकांच्या खुणा आढळल्या. ओपळकर यांनी तत्काळ पिशोर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बकऱ्या चोरी गेल्याची तक्रार दिली. यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास जमादार किरण गंडे करत आहे.

Web Title: One and a half lakh goats were stolen from the barn