शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

समोर दीड वर्षाची मुलगी, पोटात ६ महिन्यांचा गर्भ; सासरच्या जाचाने विवाहितेने संपवले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 12:05 IST

विवाहितेचा वडिलांना रात्री कॉल; नंतर काही तासातच संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर : पती सतत दारू पिऊन छळ करायचा, लग्नानंतर वारंवार विनंती करूनही त्याचे विवाहबाह्य संबंध थांबले नाहीत. नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर हे कृत्य थांबवण्याचे कबूल देखील केले. मात्र, त्रास कमी झालाच नाही. या त्रासाला कंटाळून ६ महिन्यांची गर्भवती असलेल्या अलका पवन मुटकेर (२३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री २ वाजता पती घरी परतल्यानंतर ही घटना निदर्शनास आली.

मूळ बीड जिल्ह्यातील मौजवाडी येथील असलेल्या अलका व टॅक्सी व्यावसायिक पवन यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या एका वर्षातच पवनने दारू पिऊन मारहाण करणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे सुरू केले. तेव्हा अलका यांनी त्यांच्या वडिलांना हे सर्व सांगितले. त्याच दरम्यान त्यांना मुलगी झाली. मुलगी झाल्याने पतीच्या वागण्यात सुधारणा होईल, असे वाटत होते. २०२१ मध्ये पवनने सासरच्यांना दोन लाख रुपयांची मागणी केली. मुलीला त्रास नको, म्हणून अलका यांचे वडील प्रभाकर ढेंबरे यांनी हातउसने घेऊन पैसे दिले. मात्र, पवनचा त्रास कमी झाला नाही. त्याला कंटाळून अलका माहेरी निघून गेल्या. नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर पवनने विवाहबाह्य संबंध बंद करून त्रास न देण्याचे आश्वासन दिले. त्या अटीवरच प्रभाकर यांनी मुलीला पुन्हा सासरी पाठवले होते.

दुसऱ्यांदा गर्भवती, पण पतीचा विरोधअलका या दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्या. मात्र, हे समजताच पतीने बाळ जन्माला घालायला विरोध सुरू केला. अलका गर्भपात न करण्यावर ठाम होत्या. त्यातून त्याने छळ सुरू केला. त्याचे भाऊ अजय व विजयने त्या अवस्थेत देखील अलका यांना स्वयंपाक करायला लावणे, नावे ठेवून टोमणे मारत होते. १३ डिसेंबर रोजी अलका यांनी वडिलांना कॉल करून मला घरी घेऊन जाण्यासाठी तुम्ही मला घ्यायला या, असे सांगितले. गुरुवारी प्रभाकर मुलीला घेऊन जाण्यासाठी येणार होते. मात्र, अलका यांनी रात्रीतून आयुष्य संपवले. काही तासातच वडिलांना मुलीच्या मृत्यूचा कॉल गेला. गुरुवारी सायंकाळी जवाहरनगर ठाण्यात सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांनी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक रमेश राठोड यांनी तत्काळ पवनसह त्याच्या दोन्ही भावांचा शोध घेऊन अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद