पुन्हा एकदा बोल्ड फोटोने तेजस्विनी चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:02 IST2021-03-06T04:02:26+5:302021-03-06T04:02:26+5:30

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तेजस्विनीने नुकताच एक बोल्ड फोटोशूट शेअर केला आहे. फोटोत ...

Once again Tejaswini in the discussion with a bold photo | पुन्हा एकदा बोल्ड फोटोने तेजस्विनी चर्चेत

पुन्हा एकदा बोल्ड फोटोने तेजस्विनी चर्चेत

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तेजस्विनीने नुकताच एक बोल्ड फोटोशूट शेअर केला आहे. फोटोत ती बेडवर झोपलेली दिसतेय. तिने निळ्या रंगाचा वन पीस परिधान केला असून, फोटोवर ‘A Chameleon Soul’ असे कॅप्शन दिले आहे. ‘जेव्हा पुरस्कारांची वेळ येते तेव्हा सोबर फोटो टाकायचे आणि बाकीच्या वेळेस हे असे...’ अशी कमेंट करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तेजस्विनीने त्याला, ‘बाकी वेळेस हे असे म्हणजे कसे? आणि मी अभिनेत्री आहे... दोन्ही दिसू शकते, नाही का? सोबर पण आणि तुमच्या भाषेतील ‘ही अशी पण’, असे सडेतोड उत्तर दिले आहे.

‘आरुवी’च्या हिंदी रिमेकमध्ये दंगल गर्ल

समीक्षकांची पसंती मिळवलेल्या २०१७ सालच्या ‘आरुवी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक सध्या बनत आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत बॉलिवूडची दंगल गर्ल फातिमा सना शेख दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ई. निवास हे करणार आहेत. निवास यांना ‘शूल’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. ‘आरुवी’च्या हिंदी रिमेकबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘आरुवी ही एका हीरोची कथा नसून, तो आयुष्याच्या चक्रव्यूहावर मिळवलेला विजय आहे. हा चित्रपट खूप वेगळा अनुभव देणारा आहे. यासाठी फातिमा सना शेख उत्तम निवड आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.’

हा खूप मोठा धोका आहे

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा फोटो त्याच्या परवानगीशिवाय एका चित्रपटाच्या पोस्टरवर वापरल्यामुळे बालाजी मीडिया फिल्मस्‌ प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर आता सुनील शेट्टीने एका मुलाखतीमध्ये ही कंपनी फ्रॉड असल्याचे म्हटले आहे. पुढे तो म्हणाला, ‘हे लोक अनेकांना फसवू शकतात. मी माझा मित्र हनीफचे आभार मानेन. त्याने मला काल सांगितले की, तुझ्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे आणि ते ऐकून मला आश्चर्य वाटले. या चित्रपटात काम करणे बाजूला राहिले. कोणी मला या चित्रपटात काम करणार का? असेदेखील विचारले नाही.’

Web Title: Once again Tejaswini in the discussion with a bold photo