शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून वृद्धाचा खून

By admin | Updated: August 18, 2016 00:58 IST

केज : अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे गंगाधर महादबा अंजान (वय ७०) या वृद्धास मंगळवारी क्षुल्लक कारणावरुन भावकीतीलच लोकांनी मारहाण केली.

केज : अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे गंगाधर महादबा अंजान (वय ७०) या वृद्धास मंगळवारी क्षुल्लक कारणावरुन भावकीतीलच लोकांनी मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला असून घटनेने खळबळ उडाली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, मयत गंगाधर अंजान यांना दोन मुले असून एक गावात तर एक अंबाजोगाईत राहतो. गंगधार हे गेल्या काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथे मुलाकडे रहायला गेले होेते. ते सोमवारी गावात परतले होते. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता गावातीलच मृत्यूंजय पांडुरंग अंजान, दयानंद हरीपंडीत अंजान, अर्जून एकनाथ अंजान, स्वयंभू संजय अंजान, रघुनाथ किसन अंजान व स्वराजिस संजय अंजान हे गंगाधर यांच्या घरात घुसले. ‘तू गावात का राहायला आलास?’ अशी कुरापत काढून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंगाधर अंजान यांचा जागीच मृत्यू झाला. ते मृत्यूमुखी पडल्याचे लक्षात येताच आरोपींनी तेथून पोबारा केला. मयताचा मुलगा योगीराज गंगाधर अंजान यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा नोंद झाला. घटना घडताच सहाही आरोपी फरार झाले आहेत. गावात तणावाचे वातावरण होते. बुधवारी सकाळी अंबाजोगाई येथील केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास सहायक निरीक्षक राहुल देशपांडे करत आहेत. (वार्ताहर)