वाहनाच्या धडकेने वृद्ध महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 20:57 IST2019-02-28T20:57:26+5:302019-02-28T20:57:35+5:30
पायी जाणाऱ्या वृद्धेला अज्ञात वाहनाने धडक देवून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात घडली.

वाहनाच्या धडकेने वृद्ध महिला जखमी
वाळूज महानगर : पायी जाणाऱ्या वृद्धेला अज्ञात वाहनाने धडक देवून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात घडली. सुमनबाई सुदामराव सूर्यवंशी (६५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
सुमनबाई सुदामराव सूर्यवंशी (रा. साई मंदिराजवळ, बजाजनगर) या मोठा मुलगा बाबासाहेब याच्यासोबत राहतात. घराचे काम सुरु असल्याने बाबासाहेब हे घरी थांबले होते. त्यामुळे सुमनबाई या गुरुवारी सकाळी नातू कार्तिक याला शाळेत सोडायला गेल्या होत्या. कार्तिकला शाळेत सोडून काही कामानिमित्त त्या महाराणा प्रताप चौकात गेल्या होत्या. दरम्यान, भरधाव वाहनाने सुमनाबाई यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करुन नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.
बाबासाहेब सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी व अमृता सूर्यवंशी यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. व सुमनाबाई यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, वाहनधारक घटनास्थळाहून फरार झाला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.