दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:28 IST2019-03-05T23:27:59+5:302019-03-05T23:28:08+5:30

भरधाव दुचाकीने जोराची धडक दिल्याने वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी बजाजनगर येथील त्रिमूर्ती चौकात घडली.

Old woman injured in a wheelchair | दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला जखमी

दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला जखमी

वाळूज महानगर : भरधाव दुचाकीने जोराची धडक दिल्याने वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी बजाजनगर येथील त्रिमूर्ती चौकात घडली. यमुनाबाई उखळे (७८, रा. बजाजनगर) असे जखमी महिलेचे नाव आहे.


यमुनाबाई उखळे या मंगळवारी सकाळी सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शनासाठी पायी जात होत्या. मंदिराच्या दिशेने जात असताना त्रिमूर्ती चौकात पाठीमागून भरधाव दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. यात त्या जमी झाल्या. रोहित खैरे यांनी यमुनाबाई यांचा नातू स्वप्नील उखळे यास फोनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. स्वप्नील व रोहित यांनी यमुनाबाई यांना बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान मारहाणीच्या भितीने दुचाकी चालक दुचाकीसह घटनास्थळावरुन फरार झाला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: Old woman injured in a wheelchair