शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेखमध्ये जुनेच सरकार

By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST

औरंगाबाद : राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन नवीन सरकार आले. नवीन सरकारने कारभार सुरू करून दोन महिनेही उलटले;

औरंगाबाद : राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन नवीन सरकार आले. नवीन सरकारने कारभार सुरू करून दोन महिनेही उलटले; पण तरी भूमी अभिलेख खात्याच्या लेखी मात्र अजूनही जुनेच सरकार आहे. भूमी अभिलेखच्या उपसंचालक कार्यालयात जुन्याच सरकारातील मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या झळकत आहेत. या पाट्या उतरविण्याचे भान येथील अधिकाऱ्यांना राहिलेले नाही.पंधरा वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन भाजपा-सेनेचे सरकार आरुढ झाले. हा बदल होताच सर्वच सरकारी कार्यालयांनी त्यांच्या बेवसाईटस् अपडेट केल्या. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नावे असलेल्या पाट्या उतरविण्यात आल्या; परंतु भूमी अभिलेख खात्याच्या लेखी मात्र अद्याप जुनेच सरकार कार्यरत आहे. भूमी अभिलेखच्या उपसंचालक कार्यालयात मागील सरकारमधील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नावे असलेले मोठे फलक झळकत आहेत. भूमी अभिलेख खात्याला गतिशीलता असे मोठे मथळे असलेले हे फलक असून, त्यावर मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि महसूलमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची नावे आहेत. विशेष म्हणजे राज्याचे नवीन महसूलमंत्री एकनाथ खडसे आतापर्यंत तीन वेळा औरंगाबाद दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी महसूल आणि भूमी अभिलेख खात्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. उपसंचालक कार्यालयात अगदी दर्शनी स्थळी हे फलक लावलेले आहेत. यापैकी एक फलक तर उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या केबिनसमोरील पोर्चमध्ये लावलेला आहे. त्यांना केबिनमध्ये प्रवेश करण्यासाठी या फलकासमोरून जावे लागते. तरीही हा फलक अजून तिथे असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.