शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

अरे बापरे, सहा टक्के लोक मेंटल ! शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिक मानसिक ताणतणावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 20:12 IST

मानसिक आजाराची लक्षणे काय? जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे.

औरंगाबाद :आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत. चार कुटुंबांतील किमान एक माणूस मानसिक आजारी असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीचे पूर्ण मानसिक संतुलन बिघडले तर त्या व्यक्तीला ‘मेंटल’ म्हणून हिणविले जाते. मात्र, वेळीच उपचार केला तर मानसिक आजार बरा होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटले.

जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. शहरी भाग मानसिक आजाराला बळी पडत असताना ग्रामीण भागातही मानसिक आजाराचे लोण पसरत आहे. शाळकरी मुले ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागते पण अजूनही मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याची मानसिकता नाही.

चार कुटुंबांतील किमान एकजण जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार चार कुटुंबातील किमान एकजण मानसिक आजारी आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ नुसार, २० पैकी एक भारतीय व्यक्ती डिप्रेशनचा बळी ठरतो.

‘मेंटल’ची लक्षणे काय? स्वत:विषयी भ्रामक कल्पना, अतिताण घेणे, सर्वजण माझ्याविरोधात आहे, असे सतत वाटणे, नशेच्या आहारी जाणे, चित्त एकाग्र न होणे, कामात चुका, ही लक्षणे आहेत. आजूबाजूच्या लोकांना ही व्यक्ती पूर्वीपेक्षा वेगळी वागत असल्याचे जाणवते.

मानसिक आजार वाढण्याला कारण काय? अनुवंशिकता, अतितणाव, नशेच्या पदार्थांचे सेवन, झोप कमी होणे, झेपत नाही अशी कामे करणे, ही काही कारणे मानसिक आजारवाढीला कारणीभूत ठरतात. बेरोजगारी, शिक्षण, घरगुती अडचणी, व्यसनाधीनता नैराश्यामागील कारणे आहेत.

कोणी तपासण्या करून घ्यायला हव्यात? मानसिक आजाराची कोणतीही लक्षणे जाणवत असेल आधी जवळच्या व्यक्तीशी, कुटुंबीयांशी मनमोकळे बोलले पाहिजे. आवश्यक वाटल्यास फॅमिली फिजिशियनचा सल्ला घेतला पाहिजे तरीही फरक पडत नसेल तर वेळीच शेवटी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सहानुभूतीने पाहावे मनोरुग्णांकडे सहानुभूतीने पाहावे. आजार अंगावर काढता कामा नये. घाटीत मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागात मानसिक आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जातात.- डाॅ. प्रसाद देशपांडे, मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागप्रमुख, घाटी

ओपीडीत वाढबाह्यरुग्ण विभागात मानसिक आजारांच्या रुग्णांची संख्या गेल्या दिवसांत वाढलेली आहे. नैराश्य, चिंता यासह काही मानसिक आजार समुपदेशनाने बरे होतात. पाचपैकी एक व्यक्ती नैराश्यग्रस्त असते.- डाॅ. महेश मरकड, चिकित्सालयीन मानसतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य