शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना कर्तव्याचा विसर दारूबंदीला उत्पादन शुल्ककडूनच ‘खो’

By admin | Updated: February 20, 2015 00:10 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड ग्रामपंचायतींच्या महिला ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेवून ही शासन अटीच्या नावाखाली दारूबंदी कार्यालयच या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत असल्याचे चित्र आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडग्रामपंचायतींच्या महिला ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेवून ही शासन अटीच्या नावाखाली दारूबंदी कार्यालयच या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत असल्याचे चित्र आहे. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबतचा अहवाल देण्यास सांगितले.जिल्ह्यातील तीन ते चार ग्रामपंचायतींनी महिला ग्रामसभा घेवून गावात दारूबंदी करण्याचा ठराव घेतलेला आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे ग्रामपंचायंतींना सहकार्य नसल्याने ठराव निष्फळ ठरत असल्याचा आरोप परळी तालुक्यातील सिरसाळा येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.२०१३-१४ मध्ये बीड तालुक्यातील चौसाळा ग्रामपंचायतीने देखील महिला ग्रामसभा घेवून दारू बंदीसाठी मतदान घ्या, अशी मागणी केली होती. मात्र राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी व दारू विक्रेत्यांनी वाद निर्माण करून चौसाळ्याची दारूबंदी उधळून लावली. असा, आरोप सरपंच सोनाली लोढा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.पिंपळनेर परिसरात दारूबंदीसाठी झाला होता उठावबीड तालुक्यातील पिंपळनेर येथील महिलांनी देखील जुलै २०१४ मध्ये दारूबंदीची मागणी केली होती. या मागणीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात लढा उभारला होता. मात्र दारूबंदी तर दूरच साधी महिलांच्या मागण्याची दखल देखील घेण्यात आली नव्हती. यामुळे मागणी करणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास खचून गेला व दारूबंदीची मागणी मागे पडली. प्रशासनाला मात्र याचे काहीच देणेघेणे नाही.बीड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे अधिकृत एकही ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आलेला नाही. आमच्याकडे ग्रा. प. चे ठराव आलेले आहेत. मात्र ठराव घेण्यापूर्वी संबंधीत कार्यालयाला पत्र देणे आवश्यक आहे, असे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे प्रभारी अधीक्षक राऊत यांनी सांगितले.गाव पातळीवर महिला जीवावर उदार होऊन दारूबंदीचा ठराव घेतात. यामुळे अनेक महिलांना घरातून विरोध होतो. असे असताना दारूबंदी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यांना कर्तव्याचा, जबाबदारीचा विसर पडलेला आहे. महिलांच्या दारूबंदी बाबतच्या मागण्यांकडे जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी मानवी हक्क अभियानच्या मनीषा तोकले यांनी केली.