क्रीडा कार्यालयाला पडला घाणीचा विळखा !
By Admin | Updated: January 13, 2015 00:14 IST2015-01-12T23:47:50+5:302015-01-13T00:14:25+5:30
सोमनाथ खताळ , बीड येथील जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. परीसरता सर्वत्र कचराच कचरा साचला असून बाजुच्या अपार्टमेंटमधील पाणी क्रीडा संकुलात आल्याने घाण पसरत आहे

क्रीडा कार्यालयाला पडला घाणीचा विळखा !
सोमनाथ खताळ , बीड
येथील जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. परीसरता सर्वत्र कचराच कचरा साचला असून बाजुच्या अपार्टमेंटमधील पाणी क्रीडा संकुलात आल्याने घाण पसरत आहे. यामुळे दुर्गंधी पसरत असून खेळाडूंना व कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
येथील जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या विविध कारणांनी गाजत आहे. येथे येणाऱ्या खेळाडुंच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनला असून याला केवळ येथील अधिकारीच जबाबदार असल्याचा अरोप होत आहे. कारण येथील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हा परीसर अस्वच्छ आहे. येथील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे कार्यालयात लक्ष नसल्याने आणि येथील स्वच्छता कर्मचारी व्यवस्थीत काम करीत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
क्रीडा कार्यालयाच्या बाजुलाच एक अपार्टमेंट आहे. येथील रहिवाशी आपल्या घरातील पाणी पाईपद्वारे क्रीडा कार्यालयाच्या परीसरात सोडतात. त्यामुळे येथे चिखल होतो. अनेकवेळा जास्त पाणी आल्यानंतर या पाण्यापासून दुर्गंधी पसरायला लागते. यामुळे खेळाडूंना नाकाला रूमाल लावूनच क्रीडा संकुलाच्या मैदानात प्रवेश करावा लागतो.
याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ म्हणाल्या, आम्ही अपार्टमेंटमधील लोकांना पाणी सोडू नका असे सांगितले आहे. आता त्यांचे पाईप काढून घेऊ, याउपरही नाही ऐकले तर योग्य ती कारवाई करू. परिसराची स्वच्छता करू, असेही त्यांनी सांगितले.
स्वच्छता मोहिमेचा बोजवारा
एकीकडे निमशासकीय कार्यालयापासून ते शासकीय कार्यालयांमधील सर्वांनीच हातात झाडू घेत स्वच्छता मोहिम राबविली. परीसर स्वच्छ केला, मात्र येथील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना याचा विसर पडला आहे. येथील ना अधिकाऱ्यांनी हात झाडू घेतला ना कोणाला घ्यायला सांगितला. त्यामुळे येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांनाच येथील स्वच्छतेबद्दल गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
परीसरातील अस्वच्छेतेला येथील अधिकारी, कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप केला जात असून त्यांचे लक्ष नसल्या कारणानेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
क्रीडा कार्यालयासमोर आणि पे्रक्षागृहाच्या उजव्या बाजुला बॅडमिंटन हॉल आहे. या परीसरातही सर्वत्र घाणच घाण दिसून येते. याच्या पाठीमागे लघुशंका व शौचास बसलेले असतात. यापासून दुर्गंधी पसरत आहे. मोकाट कुत्र्यांचाही वावर येथे असतो.
क्रीडा कार्यालयाचा प्रवेशद्वाराजवळील परीसर फक्त स्वच्छ दिसून येतो.
४उजव्या व मागच्या बाजुला तुटलेल्या विटा व कचराच कचरा साचलेला आहे. मागील वर्षभरापासून तरी येथील स्वच्छता केली नसावी, असे येथील कचरा व गवत पाहिल्यावर जाणवते.
४बाजुच्या अपार्टमेंटमधील पाणीही कार्यालयाच्या बाजुला व मागच्या बाजुस पडत असल्याने डासांची उत्पत्ती होत असून येथे येणाऱ्या खेळाडूंबरोबरच कर्मचाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. भिंतीवरही वेली चढली आहे.