जिल्ह्यात चार्टर्ड अकाैंटंट्सचे कार्यालय सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:04 IST2021-04-10T04:04:56+5:302021-04-10T04:04:56+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात चार्टर्ड अकाैंटंट्सचे कार्यालय, सर्व प्रकारचे ऑप्टिकल्स, टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप सुरू करण्यास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ...

जिल्ह्यात चार्टर्ड अकाैंटंट्सचे कार्यालय सुरू राहणार
औरंगाबाद : जिल्ह्यात चार्टर्ड अकाैंटंट्सचे कार्यालय, सर्व प्रकारचे ऑप्टिकल्स, टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप सुरू करण्यास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परवानगी दिली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची बैठक झाली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन व विविध संघटनांच्या निवेदनांचा विचार करून काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसा आदेशही जाहीर करण्यात आला.
पश्चिम विभागीय सीए संघटनेने ७ एप्रिल रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. तसेच त्याचदिवशी सीए संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. शहरातील सीए संघटनेचे अध्यक्ष पंकज सोनी, सीए उमेश शर्मा, प्रवीण बांगड, गणेश शिलवंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मागणीचे निवेदन दिले व कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी केली. याचा गांभीर्याने विचार करून आजच्या प्राधिकरणच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. याशिवाय ऑप्टिकल्स शॉप, टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्व्हिस सेंटर आणि स्पेअरपार्ट विक्री दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र, वॉशिंग सेंटर, डेकोर आणि तत्सम दुकाने केंद्रे बंद राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
सरकारी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करणार
संचारबंदी असताना विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा व अन्य सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात येणार आहे. तसेच या पथकांना पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे.
चौकट
* लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी. मात्र, मनपा, पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक.
* अंत्यसंस्कारावेळी हजर राहण्यासाठी २० जणांना परवानगी.