परप्रांतीयांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: November 4, 2015 00:23 IST2015-11-04T00:09:25+5:302015-11-04T00:23:31+5:30
उस्मानाबाद : नळदुर्ग येथील दोन इसमांची कागदपत्रे, फोटो परस्पर हस्तगत करून सीमकार्ड खरेदी केल्याप्रकरणी दोघा परप्रांतीयांविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

परप्रांतीयांविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : नळदुर्ग येथील दोन इसमांची कागदपत्रे, फोटो परस्पर हस्तगत करून सीमकार्ड खरेदी केल्याप्रकरणी दोघा परप्रांतीयांविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई सोमवारी दुपारी दहशतवाद विरोधी सेलने केली़
पोलीस मुख्यालयांतर्गत असलेल्या दहशतवाद विरोधी सेलचे अधिकारी, कर्मचारी सोमवारी मोबाईल कंपन्यांकडून मिळालेल्या यादीनुसार सीमकार्डची तपासणी करीत होते़ या तपासणीदरम्यान नळदुर्ग येथील ए-वन स्वीटमार्ट मध्ये काम करणाऱ्या आकाश पंढरी तेलगुर (वय-२६, रा़तेलंगणा ह़मु़ नळदुर्ग) याने महादेव आप्पाराव बनसोडे यांची कागदपत्रे व फोटो लबाडीने हस्तगत करून सीमकार्ड खरेदी केल्याचे समोर आले़ तसेच नळदुर्ग येथीलच अब्दुल रहेमान अल्वीहाजी उरक्कन (वय-४६ केरळ) याने नळदुर्ग येथील मुजीब काझी यांची कागदपत्रे लबाडीने हस्तगत करून सीमकार्ड खरेदी केल्याचे समोर आले़ या दोघांनी संबंधित इसमांची, शासनाची व मोबाईल सीमकार्ड कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी हवालदार निलाप्पा सगरे व सपोउपनि आशपाक मोमीन यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून आकाश तेलगुर व अब्दुल उरक्कन या दोघाविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ (प्रतिनिधी)