शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ओढणीने केला घात, महिलांनो दुचाकीवर बसताना घ्या काळजी; ब्रेनडेड महिलेच्या पतीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 12:29 IST

अवयदानासाठी जळगावहून औरंगाबादेत, दिवाळीच्या दिवशी तिघांच्या आयुष्यात नवा ‘प्रकाश’

औरंगाबाद : दिवाळीच्या खरेदीसाठी दुचाकीवरून जाताना पत्नीची ओढणी अचानक चाकात अडकली आणि अपघात घडला. सुदैवाने यात मी आणि चार वर्षांची मुलगी सुखरूप वाचलो; पण ओढणीमुळे पत्नीच्या गळ्याभोवती फास बसला. तिच्या मानेला आणि नसांना गंभीर दुखापत झाली. यातच ती ब्रेनडेड झाली. मातीमोल होण्यापेक्षा तिच्या अवयवदानामुळे कोणाला तरी नवीन आयुष्य मिळाले. दुचाकीवर बसताना महिलांनी ओढणी सांभाळली पाहिजे. अशी वेळ पुन्हा कोणावरही येऊ नये, अशी भावना ब्रेनडेड महिलेच्या पतीने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

जळगाव येथील ३८ वर्षांच्या महिलेचा १६ ऑक्टोबर रोजी अपघात झाला. जळगाव येथेच महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्या ब्रेनडेड असल्याची लक्षणे डाॅक्टरांनी वर्तविली. जळगावमध्ये अवयदानाची सुविधा नसल्याने त्यांना २२ ऑक्टोबर रोजी रात्री औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. कोणाला तरी नवीन आयुष्य मिळेल, या भावनेने पती आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ अवयवदानाला होकार दिला. एमजीएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता आणि शल्यचिकित्सक डाॅ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. डाॅ. सूर्यवंशी यांच्यासह डाॅ. मयुरी पोरे, डाॅ. प्रशांत अकुलवार, डाॅ. योगेश अडकिने, डाॅ. जिब्रान अहेमद, डाॅ. वासंती केळकर, पुणे येथील डाॅ. निनाद देशमुख, प्रत्यारोपण समन्वयक फरान हाश्मी, औरंगाबाद युथ सोशल वेलफेअर फाउंडेशनचे राजेशसिंह सूर्यवंशी आदींनी अवयवदानासाठी प्रयत्न केले.

हृदयदान टळले, दोन मूत्रपिंड, यकृताचे प्रत्यारोपणएका मूत्रपिंडाचे एमजीएम रुग्णालयातच ३० वर्षांच्या महिलेवर आणि दुसऱ्या मूत्रपिंडाचे युनायटेड सिग्मा हाॅस्पिटमध्ये ३७ वर्षांच्या महिलेवर प्रत्यारोपण करण्यात आले. यकृत पुणे येथील रुग्णालयात दाखल ४२ वर्षांच्या पुरुष रुग्णावर प्रत्यारोपित करण्यासाठी पाठविण्यात आले. अपघात झाल्यानंतर महिलेचे हृदय ‘सीपीआर’ देऊन कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामुळे हृदयदान टळले.

२८ वे अवयवदानअवयवदानासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. जवळपास १०० न्युरोसर्जन्सना रिपोर्ट पाठविले. अखेर अवयवदानाचा निर्णय घेतल्याचे महिलेच्या पतीने यावेळी सांगितले. मराठवाड्यातील हे २८वे अवयवदान ठरले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा अवयवदानाच्या चळवळीला पुन्हा एकदा वेग मिळाला आहे. त्यामुळे मूत्रपिंड, यकृताच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात