गुरू गणेशलाल पुण्यतिथीनिमित्त जालन्यात भाविकांची मांदियाळी

By Admin | Updated: February 8, 2016 00:12 IST2016-02-07T23:58:17+5:302016-02-08T00:12:26+5:30

जालना : कर्नाटक गजकेसरी घोर तपस्वी प.पू. गणेशलालजी म.सा. यांचा ५४ वा पुण्यतिथी सोहळा सोमवारी होत आहे. यानिमित्त शांतीचा संदेश देणाऱ्या

On the occasion of Guru Ganesh Lal's death anniversary, devotees in Jalna celebrated the festival | गुरू गणेशलाल पुण्यतिथीनिमित्त जालन्यात भाविकांची मांदियाळी

गुरू गणेशलाल पुण्यतिथीनिमित्त जालन्यात भाविकांची मांदियाळी


जालना : कर्नाटक गजकेसरी घोर तपस्वी प.पू. गणेशलालजी म.सा. यांचा ५४ वा पुण्यतिथी सोहळा सोमवारी होत आहे. यानिमित्त शांतीचा संदेश देणाऱ्या गुरूगणेशधाम येथे देशभरातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाच दिवसांपासून विविध संत- महंत आशीर्वचन सुरू आहेत.
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाने यासाठी जय्यत जयारी केली आहे. पावन समाधीस्थळ व परिसरातील २९ एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रात नियोजन आहे. शिवाजी पुतळा परिसरात गुरू गणेशधाम आहे. दर अमावास्येला येथे दर्शनासाठी हजारो भाविक येतात. यंदा प.पू. गणेशलाल म.सा. यांचा पुण्यतिथी महोत्सव व सोमवती अमावस्या येत असल्याने भाविकांच्या उत्साहात भर पडली आहे. ३ फेब्रुवारीपासून या सोहळ्यास प्रारंभ झाला.
यात मौन साधना दिवस, ४ फेब्रुवारी रोजी स्वाध्याय साधना दिवस ५ फेब्रुवारी रोजी सामायिक साधना दिवस, ६ रोजी विघ्नहरण जप आराधाना आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. ७ फेब्रुवारी रोजी तप भावना दिवस तसेच संध्याकाळी एक श्याम गुरू गणेश के नाम या भक्तीगीत संध्येचा कार्यक्रम पार पडला. ८ फेब्रुवारी रोजी गुरू गणेश गुणगान दिवस होणार आहे.
आजचे कार्यक्रम
सकाळी ६ वाजता प्रार्थना, साडेसात वाजता प्रभात फेरी, सकाळी ८.४५ वाजता रक्तदान शिबीर, साडेआठ वाजता ध्वजवंदन, नऊ वाजता गुरू गणेश गुणगान सभा प्रारंभ, तेलातप आराधक प.पू. शिवमुनजी म.सा. यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम, आचार्यसम्राट प.पू. शिवमुनीजी म.सा. हे प.पू. विवेकमुनीजी म.सा. यांना महाश्रवण ही उपाधी प्रदान करतील. चादर समर्पण सोहळा, दुपारी बारा ते अडीच वाजेपर्यंत गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वस्त मंडळ घेत आहेत परिश्रम
या पुण्यतिथी सोहळ्यासाठी सुदेशकुमार सकलेचा, डॉ. धरमचंद गादिया, स्वरूपचंद ललवाणी, कचरूलाल कुंकूलोळ, भरतकुमार गादिया, डॉ. गौतमचंद रूणवाल, संजयकुमार मुथा, विजयराज सुराणा, नरेंद्रकुमार लुणिया, सुरजमल मुथा, डॉ. कांतीलाल मांडोत हे परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)
प.पू. गुरूगणेशलाल म.सा. यांनी तप- त्याग- साधना करण्याचा संदेश जगाला दिल्याचे प्रमोदसुधाजी म.सा. प्रकाशकंवरजी म.सा. व किरणसुधाजी म.सा. यांनी सांगितले. गुरू गणेशलाल यांनी केलेले कार्य, सोसलेले कष्ट याचे यथार्थ वर्णन साध्वींजीनी केले. महाराजांनी गोसेवा, खादी व संस्कृतीचा प्रचार केला. आपल्या संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी अथक प्रयत्न केले. तोच संदेश त्यांनी जगाला दिला. प्रत्येकाने तपश्चर्या करण्याचे आवाहनही महाराजांनी केले होते. गो सेवा करा, जीवदया करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. गुरू गणेशलाल म.सा. यांच्या पावन समाधी दर्शनाने एक दिव्य अनुभूती प्राप्त होते. अनेक भाविकांना याची प्रचिती आल्याचेही प्रतिभाजी म.सा. यांनी सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महाराजांनी सदैव प्रयत्न केले. हजारो भाविक दिव्य व पुण्य अशा समाधी दर्शनासाठी आवर्जून नतमस्तक होत असल्याचे साध्वीजींनी सांगितले.

Web Title: On the occasion of Guru Ganesh Lal's death anniversary, devotees in Jalna celebrated the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.