सरकारी कामात अडथळा; आरोपीस ६ महिन्यांची कैद
By Admin | Updated: June 23, 2014 00:28 IST2014-06-22T22:51:14+5:302014-06-23T00:28:06+5:30
मंठा : सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी रमेश वामनराव भोसले (लिंबोना, ता. मंठा) यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पं.स. जोधंळे यांनी सहा महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे.

सरकारी कामात अडथळा; आरोपीस ६ महिन्यांची कैद
मंठा : सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी रमेश वामनराव भोसले (लिंबोना, ता. मंठा) यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पं.स. जोधंळे यांनी सहा महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
मंठा येथील बसस्थानकामध्ये १४ आॅगस्ट २००६ रोजी रमेश भोसले याने ‘आमच्या मुलाला मार लागला आहे’ असे म्हणून बसच्या चालकास मारहाण केली होती. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून चालकाच्या फिर्यादीवरून आरोपी भोसलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंठा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून तपासणी अंमलदार एन.जे. शेळके यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाची बाजू सहायक सरकारी अभियोक्ता एस.एस. प्रधान यांनी मांडली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जोंधळे यांनी आरोपी रमेश भोसले यास भादंवि ३५३ कलमान्वये तीन महिने साधी कैद तर ३३२ कलमान्वये सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)