शहरं
Join us  
Trending Stories
1
'गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, आमची झालेली भेट केवळ अपघात'; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण
2
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना; शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
3
“संजय राऊतांनी शिवसेनेचे दोन तुकडे करुन दाखवले, राज ठाकरेंवर बोलू नये”; मनसे नेत्यांचा पलटवार
4
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
5
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
6
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
7
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...
8
Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."
9
Mandira Bedi : "ते माझं घर चालवायला येणार नाहीत, दुःख आहे जे...."; पतीच्या निधनावर पहिल्यांदा बोलली मंदिरा
10
तो लॅपटॉप सोबतच ठेवतो अन् मॅच संपल्यावर ऑफिस काम करतो! सौरभ नेत्रावळकरची कमिटमेंट
11
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
12
Fact Check: शपथविधी सोहळ्यात गडकरींनी PM मोदींना अभिवादन केले नाही? पाहा, दाव्यामागचे सत्य
13
लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल
14
Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन'
15
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
16
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
17
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
18
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'
19
BEST Bus Breakdowns: नुसता वैताग! बेस्ट बस भर रस्त्यात बंद पडण्याचं प्रमाण वाढलं, ६ महिन्यांत २११ वेळा घटना
20
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा

नामांतराविरोधात मराठवाड्यातून आक्षेपांचा वर्षाव; रेकॉर्डवर ८ हजारांची नोंद

By विकास राऊत | Published: March 11, 2023 6:12 PM

नामांतराबाबत २७ मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडे हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत शासनाने दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याच्या शासन निर्णयाविरोधात मराठवाड्यातून आक्षेप येऊ लागले आहेत. विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी सायंकाळपर्यंत रेकॉर्डवर ८ हजार आक्षेप, हरकतींची नोंद झाली. काही आक्षेप पोस्टानेदेखील येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्याच्या महसूल प्रशासनाने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याबाबत स्वतंत्र अधिसूचना २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जारी केली. महसूल व वन विभागाने काढलेल्या अधिसूचनेत विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर असल्याचे नमूद आहे. मात्र, नामांतराबाबत २७ मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडे हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत शासनाने दिली आहे.

जुन्या 'औरंगाबाद' विभागाऐवजी छत्रपती संभाजीनगर विभाग असा बदल विभागीय आयुक्तालयापासून सर्व प्रशासकीय पातळीवर करण्यापूर्वी आक्षेप, हरकती मागविण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाला पूर्ण तालुके, मंडळ, सज्जापर्यंत नावातील बदल करावा लागणार आहे. सगळी ऑनलाइन सिस्टम, वेबसाइट्स, अभिलेखांवर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करावा लागणार असला, तरी नागरिकांच्या हरकती व सूचनांचा विचार शासनाकडून करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र जमीन व महसूल अधिनियमानुसार जिल्ह्यात येणाऱ्या तालुक्यांतील क्षेत्रांपासून जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व ठिकाणांची नावे बदलण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे. तर महापालिकेच्या हद्दीसाठी प्रशासकांनी सर्व प्रभाग कार्यालयांसाठी नामांतर अधिसूचनेच्या आधारे आदेश काढले.

जिल्ह्याची प्रशासकीय रचना अशीजिल्ह्याच्या प्रशासकीय रचनेत कार्यालय, महानगरपालिका, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा परिषद या कार्यालयांमध्ये विभागले आहे. विभागीय आयुक्तालय पूर्ण मराठवाड्यासाठी आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय रचनेत ५ महसुली उपविभाग, ९ तालुके व १,३६२ महसुली गावे आहेत. शासकीय कार्यालयांवर नावे अद्याप बदलण्यात आली नसून त्यावर 'औरंगाबाद' असेच नाव आहे.

अधिसूचनेत काय म्हटले आहे...नामांतराबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. २७ मार्च २०२३ पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येतील. या निर्धारित तारखेनंतर दाखल होणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. या तारखेपर्यंत हरकती व सूचना प्राप्त झाल्या नाहीत, तर छत्रपती संभाजीनगर या महसुली क्षेत्र नामांतराला कोणाचाही आक्षेप नसल्याचे ग्राह्य धरले जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय