शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

OBC reservation : 'ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 15:45 IST

भाजपच्या ओबीसी जागर अभियानांतर्गत औरंगाबादमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना पंकजा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं सांगितलं.

ठळक मुद्देमराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या मराठा समाजाचं आरक्षण आज संपुष्टात आलं. ओसीबी समाजाचं आरक्षण बचाव करण्याचा प्रयत्न आम्ही करत केला, ते आरक्षण आज संपुष्टात आलं.

औरंगाबाद - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्र सोडले. यावेळी, भाषण करताना पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. नरेंद्र मोदींनीं देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला 10 टक्के आरक्षण देऊ केलं, असे पंकजा यांनी सांगितलं. तर, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन बोलताना फडणवीस यांनीच ते महाराष्ट्राला दिल्याचं पंकजा यांनी म्हटलं. तसेच, राज्य सरकारने पोटनिवडणुकांच्या अगोदरच हा अध्यादेश का काढला नाही?, असा सवालही विचारला. 

भाजपच्या ओबीसी जागर अभियानांतर्गत औरंगाबादमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना पंकजा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं सांगितलं. आता एक नवीनच षड्यंत्र सुरू झालंय. बहुजनाची व्याख्या खराब करण्याचं हे षड्यंत्र आहे. इकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलला की, तिकडे कोणीतरी षड्यंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा काढतात. अरे मराठा समाजाच्या पाठीवर खंजीर खुपसण्याचं कामही तुम्हीच केलंय. मराठा समाजाला आरक्षण ज्या मुख्यंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढत होतात, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय, असे पंकजा यांनी म्हटले. 

मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या मराठा समाजाचं आरक्षण आज संपुष्टात आलं. ओसीबी समाजाचं आरक्षण बचाव करण्याचा प्रयत्न आम्ही करत केला, ते आरक्षण आज संपुष्टात आलं. महाराष्ट्रात आज राजकीय भविष्य काय, येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओसीबी समाजाच्या डोक्यावर टांगती तलवार देण्याचं काम सरकारने केलंय, असे म्हणत पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, सरकारने काढलेला ओबीसी समाजाच्या राजकीय अध्यादेश टिकला पाहिजे, सरकारने आगामी निवडणुकांसाठी तो टिकवून दाखवावा, तसं झाल्यास आम्ही सरकारचं कौतुक करू. पण, ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं नाही, तर रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराच पंकजा यांनी दिला आहे. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षणAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण