उन्हाळ्याच्या सुटीतही मिळणार पोषण आहार
By Admin | Updated: April 10, 2015 00:26 IST2015-04-10T00:11:02+5:302015-04-10T00:26:13+5:30
जालना : जिल्हा परिषद प्राथमिक , पूर्व माध्यमिक आणि टंचाईग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवविणे बंधनकारक

उन्हाळ्याच्या सुटीतही मिळणार पोषण आहार
जालना : जिल्हा परिषद प्राथमिक , पूर्व माध्यमिक आणि टंचाईग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवविणे बंधनकारक असल्यासंदर्भातील आदेश जिल्हा परिषेदच्या शिक्षणविभागाला नुकतेच प्राप्त झाले आहेत.
जालना जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यातील पीक आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या गावांतील शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे. उत्पादन खर्च, आणि गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाने जिल्ह्याला होरपळले आहे. शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहे. दुष्काळ परिस्थितीत गावातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी शिक्षण संचालक पुणे यांनी नुकतचे आदेश काढले आहेत. आठही तालुक्यांतील सर्वच गावांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उन्हाळ्याचे दीड महिना पोषण आहार शाळेतच देण्यात येणार आहे. यात जालना तालुक्यातील ३५९ शाळांचा समावेश आहे.
इयत्ता १ ते ५ वर्गातील जि.प. नगरपालिका, खाजगी, अनुदानित अशा जिल्ह्यातील ९७० गावांच्या शाळेत उन्हाळ्यात पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आदींना पोषण आहार अंमलबजावणी व्यवस्थित सुरू आहे, किंवा नाही, याची शहनिशा करावी. याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय पोषण आहार पात्र शाळांनी आपल्या कोट्यातील धान्याचा साठा सुस्थितीत उतरून घ्यावा. तो उन्हाळ्यात खराब होणार नाही याची काळजी घ्यावी, उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थी पोषण आहारापासून वंचीत राहणार नाही, अथवा विद्यार्थी उपस्थित असताना आहार न शिजविण्याची तक्रार येणार नाही, याची खबरदरादी संबधीत शाळेच्या मुख्याध्यापकांवर राहणार आहे.