निम्म्या शाळांत पोषण आहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:33 IST2017-09-09T00:33:20+5:302017-09-09T00:33:20+5:30
जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र जिल्ह्यातील निम्म्या शाळेतील पोषण आहार मागील आठ दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराचा कालावधी ८ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्याने अनेक अडचणींणा तोंड द्यावे लागत आहे.

निम्म्या शाळांत पोषण आहार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र जिल्ह्यातील निम्म्या शाळेतील पोषण आहार मागील आठ दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराचा कालावधी ८ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्याने अनेक अडचणींणा तोंड द्यावे लागत आहे.
जि. प. च्या पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. परंतु जिल्ह्यात शासनाची अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनेकडे मात्र संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वेळेत तांदुळ व धान्यादी मालाचे वाटप होत नाही, तर कधी पुरवठादाराचा कालावधी संपुष्टात आल्याने वेळेत धान्यादी माला वाटप होत नाही. या ताळमेळात मात्र विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागते. काही शाळांतील तांदूळ शिल्लक असल्याने तेथील विद्यार्थ्यांना आहार मिळाला असला तरी अनेक शाळांमध्ये तुटवडा निर्माण झाल्याने त्यांना पोषकतेपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात योजना बारगळणार नाही, याची काळजी घेत आता पुरवठादारास मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु जि. प. च्या पोषण आहार विभागातून केवळ उडवा-उडवीचे उत्तरे ऐकवयास मिळत आहेत. याबाबत नुकतीच जि.प.सदस्य सतीश पाचपुते यांनीही तक्रार केली आहे. यामुळे पहिली ते आठवीतील तब्बल ९८ हजार विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहणार असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.यात कळमनुरी-१९२0२, हिंगोली-१४८१५, सेनगाव-२२७0७, औंढा-१७१0८, वसमत-२५0९५ अशी असल्याचे म्हटले.