शिरूर तालुक्यात घटली मोरांची संख्या

By Admin | Updated: May 20, 2014 01:09 IST2014-05-20T00:29:24+5:302014-05-20T01:09:17+5:30

शिरूरकासार: शिरूर तालुक्यातील वनपरिक्षेत्रात नुकतीच पशु- पक्षी गणना करण्यात आली. यामध्ये काहींची संख्या घटल्याचे तर काहींची वाढल्याचे दिसून आले.

Number of reduced peacocks in Shirur taluka | शिरूर तालुक्यात घटली मोरांची संख्या

शिरूर तालुक्यात घटली मोरांची संख्या

 शिरूरकासार: शिरूर तालुक्यातील वनपरिक्षेत्रात नुकतीच पशु- पक्षी गणना करण्यात आली. यामध्ये काहींची संख्या घटल्याचे तर काहींची वाढल्याचे दिसून आले. पशु- पक्ष्यांच्या संख्येवर पाणीटंचाई, शिकारींचे प्रमाण याचे परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन संघटनेसह विविध सामाजिक संस्था, पशु- पक्षी प्रेमी यांच्या सहकार्याने येथे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पशु- पक्षी गणना करण्यात आली. गेल्या तेरा वर्षांपासून वन विभागाच्या सहकार्याने ही गणना करण्यात येत आहे. बौद्ध पौर्णिमेच्या दिवशीही वन्यजीवन संरक्षण व संवर्धन संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, उपविभागीय वन अधिकारी आर.आर. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध पाणवठ्यावर वन्यजीव गणना करण्यात आली. शिरूर तालुक्यात नायगाव मयूर अभयारण्य आहे. येथेही मोरांची गणना करण्यात आली. गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी मोरांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. या परिसरातील पाणीटंचाई तसेच मोरांची होणारी शिकार यामुळे मोरांचे प्रमाण घटल्याची शंका वन्यप्रेमीतून व्यक्त केली जात आहे. मोरांची संख्या कमी झाली असली तरी चिंकारा, काळवीट, ससा, उद मांजर, रानडुक्कर यांची संख्या मात्र वाढली आहे. गेल्या काही दिवसांत या परिसरात रानडुक्कर, काळवीट यांची संख्या वाढल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसानही होत आहे. या वन्यजीव गणनेचे विशेष म्हणजे राज्यात अतिदुर्मिळ असणारे आखूड कानाचे सहा घुबड येथे आढळून आले आहेत. तर लांडगा, तरस, खोकड, कोल्हा, घुबडे, ंिपंगळा यांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून आले आहे. यावर्षी झालेल्या गारपीटीमुळे वन्य जिवांच्या संख्येत घट झाल्याचे सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले. या वन्यजीव गणनेत सिद्धार्थ सोनवणे, सृष्टी सोनवणे, रविना सवई, दिपक गवळी, प्रेम चव्हाण, वनपाल एल.बी. पवार, वनरक्षक बबन येवले, वनकामगार शिवाजी आघाव, दिपक थोरात, शिवाजी कदम, लक्ष्मण मस्के, बाळू डोळस, समीर पठाण, धम्मदीप भालेराव, पांडुरंग आघाव, नवनाथ आघाव आदींनी सहभाग घेतला होता. पाणवठे असलेल्या ठिकाणी आडोशाला बसून तसेच काही ठिकाणी मचानावर बसून ही वन्यजीव गणना करण्यात आली. पाणी पिण्यासाठी येणार्‍या अनेक प्रकारच्या वन्य जिवांचा या गणनेत समावेश आहे. (वार्ताहर) वन्यजीव २०१३ २०१४ मोर १७८९१७५६ चिंकारा३३१३९८ काळवीट९७११०६६ घुबड४३२१ पिंगळा१२४९६ गरूड--०६ ससा७६८८१२ कोल्हा४२२० लांडगा०३०३ तरस०७०३ उदमांजर१८३३ रानडुक्कर८४१७६

Web Title: Number of reduced peacocks in Shirur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.