दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले

By Admin | Updated: July 9, 2014 00:30 IST2014-07-08T23:07:00+5:302014-07-09T00:30:57+5:30

उदगीर : उदगीर शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ महिनाभरात २० मोटारसायकली शहरातून चोरट्याने चोरून नेल्या आहेत़

The number of bike theft increased | दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले

दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले

उदगीर : उदगीर शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ महिनाभरात २० मोटारसायकली शहरातून चोरट्याने चोरून नेल्या आहेत़
कर्नाटक- आंध्र प्रदेशाच्या सीमेवर उदगीर शहर असल्यामुळे शहरातून चोरून नेलेल्या दुचाकी कर्नाटक व आंध्र प्रदेशात हे चोेरटे लंपास करीत आहेत़ दुचाकी चोरी गेल्यानंतर फिर्याद देण्यासाठी फिर्यादी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तुम्हीच गाडी शोधा असा सल्ला पोलिसांकडून देण्यात येत आहे़ शिवाय आपली गाडी आपल्याला सांभाळता येत नाही का? पोलिसांना एवढेच काम आहे का? असा उपदेशही फिर्यादीला दिला जात आहे़ शहरात नंबरविना चालणाऱ्या दुचाकींचा शोध पोलिसांकडून घेतला जात नाही़ शहर व ग्रामीण पोलिसांनी आरटीओच्या सहाय्याने दुचाकी तपासण्याची मोहीम हाती घेण्याची मागणी शहर व तालुक्यातील नागरिक व वाहनधारकांनी केली आहे़ (वार्ताहर)

Web Title: The number of bike theft increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.