शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमच्या क्रमांकाद्वारे शेतकऱ्याला गंडविले

By admin | Updated: March 17, 2015 00:40 IST

परतूर : एटीएमचा चौदा अंकी कोड घेऊन भामट्यांनी एका शेतकऱ्याच्या खात्यावरून या कोडच्या आधारे विविध वस्तूंची खरेदी करत ९९ हजार रुपयांना गंडविले.

परतूर : एटीएमचा चौदा अंकी कोड घेऊन भामट्यांनी एका शेतकऱ्याच्या खात्यावरून या कोडच्या आधारे विविध वस्तूंची खरेदी करत ९९ हजार रुपयांना गंडविले. मात्र याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला.‘मी बँक मॅनेजर बोलतो, आपले एटीएम बंद पडले आहे. कार्डवरील चौदा अंकी कोड सांगा’ असा भ्रमणध्वनी दत्तात्रय कुंडलिकराव ढगे (रा. वरखेड ता. पाथरी जि. परभणी ) यांना १९ जानेवारी २०१५ रोजी आला. यावरून ढगे यांनी सदर इसमाला हा चौदा अंकी कोड दिला. पुढे या कोडचा वापर करून स्टेट बँक आॅफ इंडिया परतूर शाखेतील खात्यावर असलेल्या ९९ हजाराची आॅनलाईन विविध कंपन्याचे समान खरेदी करून हे पैसे काढण्यात आले. नंतर या बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी ढगे यांना फोन करून सांगितले की, तुमच्या खात्यावरील पैसे कमी झाले. बँकेत येऊन भेटा. यावरून ढगे बँकेत आले असता त्यांना आपल्या खात्यावरून उसाचे ५६ हजार रुपये व कपाशीचे ४४ हजार ८०० रुपयांपैकी ९९ हजार गायब झाल्याचे लक्षात आले. याबाबत ढगे यांनी या खात्यावरील व्यवहाराची माहिती मागितली. शाखा व्यवस्थापकाने ती देण्यास टाळाटाळ केला असल्याचा आरोप ढगे यांनी केला. तसेच या प्रकाराची तक्रार देण्यास परतूर पोलिसात गेलो असता पोलिसांनीही तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे सांगून शेवटी पोलिस अधीक्षकांकडे आपण धाव घेतली व नंतर आपली तक्रार घेण्यात आली असे ढगे म्हणाले. याप्रकरणी परतूर पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)