"नालायकांनो आपला पक्ष..."; आता 'त्याच' पद्धतीनं उत्तर देऊ, शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:43 PM2023-11-29T16:43:34+5:302023-11-29T16:44:11+5:30

"आता तुमची लिमिट संपली आहे. आता जर तुम्ही वाकडं बोलायला सुरुवात कराल, तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे..."

Now let's answer in the same way Sanjay Shirsat's direct target on the Uddhav Thackeray group | "नालायकांनो आपला पक्ष..."; आता 'त्याच' पद्धतीनं उत्तर देऊ, शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा

"नालायकांनो आपला पक्ष..."; आता 'त्याच' पद्धतीनं उत्तर देऊ, शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'नालायक' शब्द वापरत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यानंतर, याच शब्दावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट, यांच्यात जबरदस्त वाकयुद्ध सुरू झाले आहे. आता या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा साधला आहे. "नालायकांनो आपला पक्ष सांभाळाना. आता तुमची लिमिट संपली आहे. आता जर तुम्ही वाकडं बोलायला सुरुवात कराल, तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ते प्रत्रकारांसोबत बोलत होते.

शिरसाट म्हणाले, "काल उबाठा गटाच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांसंदर्भात अपशब्द वापरले. त्यांनी सांगितले की त्या शब्दाला शिवी म्हणता येणार नाही. आम्हाला नालायक म्हणत आहे. आम्ही काय केले? सर्व सामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यायचे काम करतोय म्हणून नालायक, शिवसेना प्रमुखांच्या नावावर दवाखाने काढलेत म्हणून आम्ही नालायक, आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात कारवाई करत आहोत, जी ५० वर्षांत कुणाला जमले नाही, म्हणून आम्ही नालायक, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही हे सर्व करत आहोत, म्हणून आम्ही नालायक आहोत, आम्ही सर्वसामान्य जनतेत फिरत आहोत म्हणून आम्ही नालायक. आहोत आम्ही नालायक. आम्ही घरात बसलेलो नाही. आम्ही कधी घरात बसून टोमने मारलेले नाही."

...म्हणून यांच्या तोंडात असे शब्द येऊ लागले आहेत -
"या नालायक शब्दासंदर्भा जे स्पष्टिकरण देत आहेत, त्या नालायकांना मला सांगायचे आहे, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, पण तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात. कारण नालायक शब्द चांगला आहे. तुम्हाला तो आवडतोय, म्हणून मी तो वापरतोय. नालायकांनो ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदूत्वासाठी आपली हायात घालवली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करू नये, असे ज्यांचे मत होते. त्यांचे मत डावलून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. नालायकांनो तुम्हाला हे पाप फेडावे लागणार आहे. म्हणून जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे. खरे तर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यांना नालायक ठरवणाऱ्या लोकांना हे मांडीवर घेऊन बसू लागले आहेत. म्हणून यांच्या तोंडात असे शब्द येऊ लागले आहेत. जे यांना शिव्या देत होते. जे यांची टिंगल टवाळी करत होत्या, अशा लोकांच्या सहवासात असल्याने यांच्या तोंडात असे शब्द येत आहेत," अशा बद्दात शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांव हल्ला चढवला.

ही आहे तुमची पोटदुखी -
एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे नेते झाल्याचे दुःख तुम्हाला होत आहे, शिवसेने प्रमुखांचे विचार घेऊन पुढे चालले आहेत, याचं दुःख तुम्हाला होत आहे. एकनाथ शिंदे आता सर्वसामान्यांना मान्य असलेलं नेतृत्व होत आहेत, ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही बसा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर. नालायकांना दुसरं काय सुचणार? हीच तुमची लायकी आहे ना?

आता वाकडं बोलाल, तर त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल -
देशाच्या राजकारणावर बोलतायला जात आहे. मुख्यमंत्री तेलंगाणामध्ये  गेले, तर एकीकडे त्यांच्यावर टीका करतायत, तर दुसरीकडे म्हणताय राष्ट्रवादीला का घेऊन गेले नाही? अरे बाबा तुम्हाला काय करायचंय? नालायकांनो आपला पक्ष सांभाळाना. मी पहिल्यांदाच असं यासाठी बोलतोय की, आता तुमची लिमिट संपलेली आहे. आता जर तुम्ही वाकडं बोलायला सुरुवात कराल, तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. तुम्हा स्वतःला काय समजता? शिवसेना प्रमुख समजता. आमचे दैवत आहे ते. कुणी तरी एकाठिकाणी हिंदुहृदय संम्राट लिहिलं. तर तुम्ही टीका करायला सुरुवात केली. शिसैनिक बाळासाहेबांच्या चरणी लीन होण्यासाठी जात असताना दगडफेक करता तुम्ही. त्यांना गचांड्या देता तुम्ही. नालायकांनो तुम्हाला हे पाप फेडावे लागणार आहे. 
 

Web Title: Now let's answer in the same way Sanjay Shirsat's direct target on the Uddhav Thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.