शिधापत्रिकाधारकांना आता घरपोच प्रमाणपत्र
By Admin | Updated: May 14, 2014 23:53 IST2014-05-14T23:45:52+5:302014-05-14T23:53:36+5:30
कळमनुरी : राजीव गांधी जीवनदायी योजनेतंर्गत कळमनुरी तालुक्यातील ५४ हजार शिधापत्रिकाधारकांना घरपोच आरोग्य प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.

शिधापत्रिकाधारकांना आता घरपोच प्रमाणपत्र
कळमनुरी : राजीव गांधी जीवनदायी योजनेतंर्गत कळमनुरी तालुक्यातील ५४ हजार शिधापत्रिकाधारकांना घरपोच आरोग्य प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते राजीव गांधी जीवनदायी योजनेचे कार्ड वितरण करण्यात आले. त्यात असोलेवाडी येथील शिक्षापत्रिका असलेल्यांची प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले होते. या महिन्यात तलाठी, आशा वर्करमार्फत घरोघरी जावून शिक्षापत्रिकाधारकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तालुक्यातील एपीएलचे १९ हजार ८६४, एपीएल प्राधान्य गटाचे १६ हजार २७२, अंत्योदयचे ५ हजार ७०३, अन्नपूर्णा योजनेचे १४८ मिळून एकूण ५४ हजार ९९ शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकाधारकांना आरोग्य प्रमाणपत्र दिले जात आहेत. महसूल मंडळनिहाय तलाठी, सज्जे, निहाय प्रमाणपत्रे वितरण केले जात आहे. प्रमाणपत्र वितरणसाठी एका महिन्याचा कालावधी लागणार आहे. नागरिकांनी वेळ, पैसा, श्रम, वाचावेत यासाठी हा अभिनव उपक्रम तहसील कार्यालयाने राबविला आहे. लाभार्थी कुटुंबांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार नि:शुल्क व विनासायास मिळण्यासाठी प्रयत्न आहे. (वार्ताहर)