विकास कामांचा आता ‘स्पॉट’ पंचनामा !
By Admin | Updated: May 21, 2014 00:14 IST2014-05-20T23:44:16+5:302014-05-21T00:14:01+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात राबविलेल्या विविध विकासकामांचा अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे हे स्पॉटपंचनामा करत आहेत़

विकास कामांचा आता ‘स्पॉट’ पंचनामा !
बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात राबविलेल्या विविध विकासकामांचा अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे हे स्पॉटपंचनामा करत आहेत़ त्यामुळे अनियमितता करणार्यांची अक्षरश: झोप उडाली आहे़ मंगळवारी पहिल्याच दिवशी कोल्हे यांनी पाटोदा तालुक्यातील अंमळनेर परिसरात पाहणी केली़ समाजकल्याण विभाग, तेरावा वित्त आयोग, झेडपीआर, दलित वस्ती विकास योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेला आहे़ मात्र, या कामांचा दर्जा राखला आहे की नाही? याची खातरजमा झाली नव्हती़ काही कामांच्या गुणवत्तांबाबत तक्रारीही आल्या होत्या़ त्यानुषंगाने अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे यांनी बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभागांना पत्र पाठवून किती कामे सुरु आहेत?, किती प्रशासकीय मान्यता दिल्या?, किती कामांची बिले अदा केली? याची माहिती मागविली; परंतु अद्याप कोल्हे यांना ही माहिती मिळालेली नाही़ त्यामुळे या दोन्ही विभाग संशयाच्या भोवर्यात आडकले आहेत़ तरतूद कमी असताना जास्तीची बिले अदा करणारा लेखा व वित्त विभागही चौकशीच्या फेर्यात आहे़ दरम्यान, मंगळवारी अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे यांनी पाटोदा तालुक्यातील अंमळनेर परिसरात दलित वस्ती, झेडपीआरमधून केलेल्या कामांची पाहणी केली़ यासंदर्भात डॉ़ कोल्हे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दुजोरा दिला़ विकासकामांची पाहणी कुठल्या एका भागात नव्हे तर जिल्हाभर करण्यात येणार आहे़ कामांमध्ये दर्जा आहे की नाही याची खात्री केली जात आहे़ (प्रतिनिधी) उपाध्यक्ष पती बैठकीत! मंगळवारी सायंकाळी अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे यांनी आपल्या दालनात बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली़ या बैठकीला उपाध्यक्ष अर्चना आडसकर यांनाही पाचारण केले होेते; परंतु त्यांच्याऐवजी त्यांचे पती रमेश आडसकर यांनीच हजेरी लावली़ कामांमध्ये दर्जा राखा, अनियमितता करु नका अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा शब्दांत डॉ़ कोल्हे यांनी त्यांना सुनावले़ रमेश आडसकर यांनी देखील अधिकार्यांना सूचना केल्या़