आता देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा सुरू झाला : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:06 IST2018-12-08T23:03:00+5:302018-12-08T23:06:14+5:30

आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

 Now the business of divining caste and caste has started: Nana Patole | आता देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा सुरू झाला : नाना पटोले

आता देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा सुरू झाला : नाना पटोले

औरंगाबाद : आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
सकाळी ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते. ‘काय तर म्हणे हनुमान दलित आहे. का तर म्हणे तो रामाच्या पायाशी बसलेला आहे. पायाजवळची माणसे दलित. ही २१ व्या शतकातील यांची धारणा काय सांगून जाते? किती हा जातीयवाद आणि संकुचितता? असे सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केले.
नरेंद्र मोदी खासदारांनाही बोलू देत नाहीत. ‘नोकरी’ (पदे) टिकवण्यासाठी मोठ-मोठे नेतेही मोदींपुढे कशी जी हुजरेगिरी करतात, याचे अनेक किस्से पटोले यांनी सांगितले. ते म्हणाले, जीएसटीवरून माझे मोदींशी मतभेद झाले. भाजप खासदारांच्या बैठकीत मी माझे म्हणणे मांडले असताना मला मोदींनी सुनावले. ‘अब आप हमको सीखाऐंगे क्या? असा सवाल त्यांनी मला केला. मग त्या बैठकीत कुणालाच बोलू दिले गेले नाही.
जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे म्हणजे लोकशाही, असे मी मानतो. याचाच प्रचंड अभाव भाजपमध्ये आढळून आल्याने मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो, असे ते म्हणाले.
सगळ्यात वाईट मुख्यमंत्री...
देवेंद फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. पटोले यांनी सांगितले की, महाराष्टÑात आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात वाईट मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. या मंडळींनी महाराष्टÑाचे वाटोळे करून ठेवले आहे. सुधाकर नाईक यांनी सुरू केलेल्या जलसंवर्धन योजनेचे नाव बदलले आणि महाराष्टÑात पाणीच पाणी असे सांगत ते देशभर मार्केटिंग करीत फिरत आहेत. मग महाराष्टÑातील १५३ तालुक्यांमध्ये टँकर्स कसे चालू आहेत.
मराठवाड्यातून १ हजार २५० उद्योग गेले. राज्यावरील कर्जाचा बोजा आघाडी सरकारच्या काळातल्यापेक्षा कितीतरी पटीने वाढला. दरवर्षी पाच लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात केले होते. प्रत्यक्षात नोकºया तर दिल्या नाहीतच; पण त्या खाल्ल्या. आज राज्य सरकारी कर्मचाºयांची संख्या ४० टक्केच आहे. ६० टक्के कर्मचारी कमी आहेत. हे चांगल्या प्रशासनाचे लक्षण नाही, असे पटोलेंनी बजावले.
यावेळी श्याम पांडे, राजेंद्र परसावत, हिशाम उस्मानी, सत्तार खान आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Now the business of divining caste and caste has started: Nana Patole