शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल मनोरे असलेल्या घरांना नोटिसा

By admin | Updated: January 23, 2015 00:58 IST

औरंगाबाद : मोबाईल कंपन्या शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत मनोरे (टॉवर) उभे करीत आहेत. परंतु जेव्हा कर वसुलीची मागणी होते, तेव्हा कंपन्या न्यायालयात प्रकरण नेऊन ते थंड बस्त्यात टाकतात

औरंगाबाद : मोबाईल कंपन्या शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत मनोरे (टॉवर) उभे करीत आहेत. परंतु जेव्हा कर वसुलीची मागणी होते, तेव्हा कंपन्या न्यायालयात प्रकरण नेऊन ते थंड बस्त्यात टाकतात. त्यामुळे यापुढे ज्या घरावर मोबाईल टॉवर उभे राहील, त्या मालमत्ताधारकांकडूनच वसुली करता येईल काय, याची कायदेशीर बाजू तपासण्याचे आदेश महापालिकेच्या स्थायी समितीने गुरुवारी दिले. महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्याचे अनेक उपाय गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी सुचविले. नगरसेवक मीर हिदायत अली यांनी शहरात अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या मोबाईल टॉवरचा मुद्दा उपस्थित केला. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, असे आदेश सभापती विजय वाघचौरे यांनी दिले. यावर खुलासा करताना काकडे यांनी सांगितले की, शहरात विविध मोबाईल कंपन्यांचे ३७३ मनोरे आहेत. त्यातील फक्त ४६ अधिकृत असून, उर्वरित ३२७ अनधिकृत आहेत. या मनोऱ्याच्या कराची थकबाकी ६ कोटी रुपयांच्या घरात आहे. सदर कंपन्यांकडे कराची मागणी करताच त्या न्यायालयात जातात. न्यायालयात प्रकरणे पडून राहतात. नगरसेवक त्र्यंबक तुपे म्हणाले की, कंपन्यांचा मनपाशी थेट संबंध येत नाही; परंतु हे मनोरे शहरातच उभारले जातात. ते कुणाच्या तरी घरावर उभे आहेत व उभे राहत आहेत. मालमत्ताधारकांच्या पूर्व परवानगी व आर्थिक लाभाशिवाय ते उभे राहू शकत नाही. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकांशी बोलणी करून मनोऱ्याचा टॅक्स एकरकमी त्यांच्याकड़ून वसूल करावा. त्यांना तशा नोटिसा द्याव्यात. इतर नगरसेवकांनीही तुपे यांच्या म्हणण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे सदर प्रकरणी कायदेशीर बाजू तपासण्याचे आदेश सभापतींनी दिले.