धारुरात दुष्काळातही शेतकऱ्यांना नोटिसा

By Admin | Updated: December 18, 2014 00:38 IST2014-12-18T00:05:04+5:302014-12-18T00:38:33+5:30

धारूर : येथील स्टेट बँक आॅफ इंडिया कडून ऐन दुष्काळतही शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा सुरू आहे़ त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत़

Notices to farmers in Dharur due to famine | धारुरात दुष्काळातही शेतकऱ्यांना नोटिसा

धारुरात दुष्काळातही शेतकऱ्यांना नोटिसा


धारूर : येथील स्टेट बँक आॅफ इंडिया कडून ऐन दुष्काळतही शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा सुरू आहे़ त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत़
एसबीआयकडून पीक कर्ज, मोटार पाईपलाईन व व्यवसायासाठी कर्ज देण्यात आले होते़ खरीप आणि रबी या दोन्ही हंगामाने शेतकऱ्यांना निराश केले़ त्यामुळे कर्ज तर दूरच पण व्याजाची रक्कमही परत करणे शेतकऱ्यांना शक्य नाही़ कर्जबाजारी शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत़ मात्र एसबीआय बँकेने अशा स्थितीतही शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवला नाही़ भर दुष्काळतही वसुलीचा तगादा सुरू आहे़ शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी नोटिसाही गेल्या आहेत़
एसबीआयचे व्यवस्थापक एस़ राजेंद्र म्हणाले, बँकेने वसुलीसाठी नोटिसा दिल्या नाहीत़ लोक अदालतीत प्रकरणे मिटावीत यासाठी नोटिसा दिल्या होत्या़ (वार्ताहर)४
दुष्काळी स्थिती असताना वसुलीचा तगादा लावणे चुकीचे आहे़ शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे डॉ़ जितेंद्र ओव्हाळ यांनी केली़

Web Title: Notices to farmers in Dharur due to famine