शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

समांतरच्या कंपनीला नोटीस

By admin | Updated: February 3, 2015 01:01 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पालिका प्रशासनाने करार रद्द करण्याचा धमकीवजा इशारा देणारी नोटीस आज बजावली आहे.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पालिका प्रशासनाने करार रद्द करण्याचा धमकीवजा इशारा देणारी नोटीस आज बजावली आहे. जलवाहिनीचे काम तातडीने सुरू केले नाही, तर कंपनीने येथून चालते व्हावे, असा सूर प्रशासनाने सहा महिन्यांतच आळविला आहे. कंपनी मार्चनंतर पोबारा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे. कंपनी नवीन जलवाहिनीचे काम सुरू करीत नाही. डागडुजीच्या कामांकडे व अंतर्गत जलवाहिनीच्या कामांकडे दुर्लक्ष करीत आहे. १५ फेबु्रवारीपर्यंत जलवाहिनीचे काम सुरू करण्याचा कंपनीने शब्द दिला आहे. मात्र, अजून कंपनीची कुठलीही तयारी नसल्यामुळे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जसजसे निवडणुकीचे वातावरण तापत आहे, तसतसे समांतर जलवाहिनीच्या कामावरून राजकारणही तापू लागले आहे. आज महापौर बंगल्यावर जलवाहिनीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या पहिल्या बैठकीतच जोरदार हंगामा झाला. महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, सभापती विजय वाघचौरे, सदस्य समीर राजूरकर, गटनेते गजानन बारवाल, अफसर खान, आयुक्त महाजन, शहर अभियंता एस. डी. पानझडे, हेमंत कोल्हे यांची उपस्थिती होती. कंपनीचे दोन प्रतिनिधी बैठकीला उपस्थित असल्यामुळे बैठकीत वाद चिघळला. नगरसेवक खान यांनी रखडलेल्या जलवाहिनीच्या कामाची संचिका अभियंता कोल्हे यांच्या दिशेने भिरकावली. हर्सूल तलावातील पाणी आटत आले आहे. त्यामुळे जायकवाडीवरून १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी कंपनीकडे काय नियोजन आहे, याची विचारणा उपमहापौर संजय जोशी यांनी केली. कंपनीचे प्रतिनिधी म्हणाले, जायकवाडी पंप वाढवून पाणीपुरवठा करू. कंपनीने मोघम उत्तर दिल्यामुळे समिती सदस्य संतापले. कुठलीही व्यवस्था करता येत नसेल तर उन्हाळ्यात नागरिकांना मोठा त्रास होण्याची शक्यता सदस्यांनी वर्तविली. नवीन जलवाहिनी टाकणे, व्हॉल्व्ह दुरु स्ती करण्याची कामे कंपनीने केली नाही, तर ती कामे पालिका करील. कंपनीला दरमहा देण्यात येणाऱ्या ५ कोटी रुपयांतून केलेल्या कामांची रक्कम कपात करण्याचा निर्णय बैठकीत झाला. मनपाने चार दिवस शटडाऊन घेऊन दुरुस्तीची, जलवाहिनीची कामे हाती घ्यावीत. प्रशासनाने कंपनीला कामांत सुधारणा करा, अन्यथा कारवाई करावी लागेल, अशी नोटीस बजावली आहे. पुढच्या आठवड्यात पाणीपुरवठ्यावर पुन्हा बैठक होईल, असे उपमहापौर जोशी यांनी सांगितले. मनपा निवडणुकीच्या तोंडावर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा शब्द कंपनीने दिला आहे; परंतु पाणीपुरवठ्याचे कुठलेही व्यवस्थापन नसल्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याची घोषणा कागदावरच राहणार आहे. ४समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला १५ फेबु्रवारीपर्यंत पालकमंत्री रामदास कदम यांनी डेडलाईन दिली आहे. समांतरचा करार तपासा, त्यातील चुकीच्या बाबी पाहा, असे आदेश पालकमंत्र्यांनी आयुक्त पी. एम. महाजन यांना दिले आहेत. त्यानंतरच मनपाने कंपनीला नोटीस बजावली आहे. ४कंपनीच्या प्रतिनिधींना मनपाच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्याची एबीसीडी समजावून सांगावी लागते. समांतर जलवाहिनीच्या कामासाठी तत्कालीन केंद्र व राज्य शासनाने १६२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यावर ७२ कोटी रुपयांचे व्याज बँकेत जमा झाले आहे. २३२ कोटी रुपयांचा योजनेचा निधी आहे. त्याचा पहिला हप्ता ३१ मार्चपूर्वी कंपनीला देण्यासाठी मनपातील अधिकारीच पाठपुरावा करीत आहेत. त्यासाठी पत्रव्यवहारदेखील झाला आहे.