शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:19 AM

जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर झालेल्या अतिक्रमणांबाबत आज शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ज्या उद्देशासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला जिल्हा परिषदेने ९९ वर्षांच्या लीजवर जागा दिलेली आहे, त्या उद्देशासाठी ती वापरली जात नाही.

ठळक मुद्देऔरंगाबाद जि.प. स्थायी समितीचा निर्णय : मालमत्तांवरील अतिक्रमणासंबंधी सदस्य आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर झालेल्या अतिक्रमणांबाबत आज शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ज्या उद्देशासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला जिल्हा परिषदेने ९९ वर्षांच्या लीजवर जागा दिलेली आहे, त्या उद्देशासाठी ती वापरली जात नाही. या जागेसाठी झालेला भाडेतत्त्वाचा करार रद्द करण्यासंबंधी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, उपाध्यक्ष केशव तायडे, बैठकीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, सभापती विलास भुमरे, मीना शेळके, कुसुम लोहकरे, सदस्य अविनाश पाटील गलांडे, किशोर बलांडे, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे, रमेश बोरनारे, किशोर पवार, राजू जैस्वाल आदी उपस्थित होते.किशोर बलांडे यांनी प्रश्न उपस्थित केला की, जिल्ह्यात जि. प. च्या किती जागांवर अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे माहिती आहे का. मागील बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली? तेव्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी सभागृहात सांगितले की, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांच्या संरक्षणासाठी शासनाने पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना नोडल आॅफिसर म्हणून नेमले आहे. यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली अधिकाºयांची समिती स्थापन केली असून, या महिन्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत आतापर्यंत दोन बैठका घेण्यात आल्या. आतापर्यंत १७ मालमत्तांची माहिती प्राप्त झाली. आरोग्य आणि अन्य विभागांच्या मालमत्तांची माहिती प्राप्त झालेली नाही. विभागप्रमुखांकडे मालमत्तांचा ७/१२ चा उतारा व नोंदणी प्रमाणपत्रांची मागणी केली आहे. किती जागांवर अतिक्रमण झाले आहे, यासंबंधीही सविस्तर माहिती मागितली आहे. जिल्हाभरातील जि. प. मालमत्तांची रीतसर मोजणी करून घेणे गरजेचे आहे, असे सांगून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरसे म्हणाले की, सर्व कायदेशीर प्रक्रिया करूनच अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल. रमेश गायकवाड, अविनाश गलांडे, किशोर बलांडे यांनी औरंगाबाद शहरातील दिल्लीगेटलगतच्या जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण करून पेट्रोलपंप उभारण्यात आला आहे.पैठण रोडलगत जि.प.ची ३२ एकर जागा आहे. त्या जागेवर कृषी विद्यापीठाने अतिक्रमण केले आहे. औरंगाबाद पंचायत समितीच्या जागेवर एका व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोपही केला. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला वर्षाला अवघा १ रुपया आकारून ९९ वर्षांच्या लीजवर जिल्हा परिषदेने जागा दिली आहे. मात्र, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाने ज्या उद्देशाने ती जागा घेतली होती, तो उद्देश साध्य झालेला नाही. त्यामुळे मराठवाडा सांस्कृतिक मंडळासोबतचा भाडेकरार रद्द करण्यापूर्वी नोटीस बजावण्याचा निर्णय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी सभागृहात घेतला....अन् अध्यक्षा डोणगावकर संतापल्याअतिक्रमणाच्या मुद्यावर पदाधिकारी गप्प असल्यामुळे शंका यायला लागली आहे, असा आरोप मधुकर वालतुरे यांनी करताच संतप्त अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांंनी माईक हातात घेऊन प्रतिप्रश्न केला. त्या म्हणाल्या अलीकडच्या दीड वर्षात जि.प.च्या जागांवर अतिक्रमणे झालेली आहेत का. कोणत्याही प्रश्नांवर राजकारण करू नका. तुम्ही हा प्रश्न केलाच कसा.तेवढ्यात रमेश गायकवाड यांनी महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. या प्रश्नावर राजकारण करून विषयाला बगल देऊ नका, अशी कोपरखळी वालतुरे यांना मारली. दरम्यान, औरंगाबाद पंचायत समितीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी रीतसर नोटीस बजावण्यात यावी. त्यानंतर रीतसर पोलीस बंदोबस्त घेऊन ते अतिक्रमण पाडण्याच्या सूचना गटविकास अधिकारी राठोड यांना दिल्या.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद